MAH CET LLB 2020: MAH-LLB CET 2020 चा निकाल घोषित, 'असे' पहा आपले गुण
MAH CET LLB 2020: एलएलबीच्या पाच वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी 11 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल आपल्याला cetcell.mahacet.org. या साईटवर पाहता येईल.
मुंबई: एलएलबीसाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलचा निकाल घोषित झाला असून सौरभी पारीख हीने 131 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला आहे. स्मृती भूताडा आणि खुशी खेमका या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.
MAH CET LLB साठी 11 ऑक्टोबर रोजी 150 गुणांची प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. याबाबत दोन गटात निकाल घोषित करण्यात आला आहे. पहिला गट हा महाराष्ट्र राज्य आणि दुसरा गट हा ऑल इंडिया कॅन्डिडेट असा आहे. पुढच्या कार्यक्रमाबद्दल लवकरच तारखा जाहीर करण्यात येतील असं सांगण्यात आलं आहे.
विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या संस्थेच प्रवेश मिळवण्यासाठी CAP हा अर्ज भरावा लागणार आहे. मेरिट आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार संबंधित जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी Admission Reporting Centre (ARC) च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फी भरावी लागणार आहे.
निकाल असा पहा: पायरी 1: स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या- cetcell.mahacet.org पायरी 2: या लिंकवर क्लिक करा- 'Click Here for Result of MAH LL.B-5 Yrs. (Integrated) CET 2020' पायरी 3: त्यानंतर समोर पीडीएफ डॉक्युमेंट दिसेल. त्यात उमेदवाराचे नाव, रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर, कॅटेगरी आणि गुण या सगळ्याची माहिती असेल. पायरी 4: त्यामध्ये आपले नाव टाइप करा आणि गुण पहा.
निकाल पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://drive.google.com/file/d/1kFejm3B6-58kMuaZ97Xo1SqcL8QO7khq/view
महत्वाच्या बातम्या: