एक्स्प्लोर

नॉन रेड झोनमध्ये आजपासून एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरु, कसं आहे बसचं नियोजन?

अटी आणि शर्ती पाळत नॉन रेड झोनमध्ये जिल्हांतर्गत एसटी बस सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निवडक मार्गांवर आजपासून लालपरी धावणार आहे

मुंबई : रेडझोन आणि कन्टेन्मेंट झोन वगळता एसटीची जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक आजपासून सुरु होणार आहे. नॉन रेड झोनमध्येच एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरु असेल. अटी आणि शर्ती पाळत ही सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे.

"23 मार्चपासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बस सेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. परंतु लॉकडाऊनच्या चौथ्या कालावधीत राज्य शासनाने रेड झोन आणि कन्टेन्मेंट झोन वगळता काही अटींसह एसटी महामंडळाला केवळ जिल्ह्यांतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गावर शुक्रवार (22 मे) पासून एसटी बस सेवा सुरु होणार आहे," अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

खालील नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

1. जिल्हा-अंतर्गत सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच ही बस सेवा सुरु राहणार आहे. 2. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करुन निर्जंतुक केलेल्या असतील. 3. सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ 50 टक्के प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल. (साधारण एका बस मध्ये 20 ते 22 प्रवासी, एका सीटवर एकच प्रवासी ) 4. ज्येष्ठ नागरिक आणि दहा वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून) 5. प्रत्येक प्रवाशाने आणि एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे. 6. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने आणि एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.

जिल्ह्यानुसार एसटी बसचं नियोजन

सांगली - सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यात 10 एसटी डेपो आहेत. - आजपासून प्रत्येक डेपोतून जवळपास 4 बस सुटतील, ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे सांगलीत येतील - मास्क घातलेले, एका सीटवर एक प्रवासी असे 22 प्रवाशी घेऊन बस धावेल. कोणीही बस मध्ये उभा राहून प्रवास करणार नाही याची खबरदारी घेतली जाणार - बसमधील चालक, कंडक्टर यांचे बससोबत ग्रामीण भागातील मुक्कामाचे प्रमाण कमी राहणार - दररोज बस स्वच्छ करुन मग धावणार

परभणी-हिंगोली परभणी आणि हिंगोलत 32 बसच्या 360 फेऱ्या होणार आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी विभागीय नियंत्रक कार्यालया अंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मिळून 7 डेपो आहेत. त्यामधून आज 32 बस सोडण्यात येणार आहे. एकूण 360 फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. सकाळी 7 वाजता पहिली बस ही निघणार आहे. सर्व बस जिल्ह्यांअंतर्गत धावणार आहेत, ज्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी दिली आहे.

सोलापूर सोलापूर जिल्ह्यात 9 एसटी डेपो, एकातून ही गाडी सुटण्याची सध्या व्यवस्था नाही.

औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यात 6 आगरातून आजपासून बस धावणार आहेत आगार पैठण 3 बस 28 फेऱ्या 1145 किमी 6 चालक 6 वाहक सिल्लोड - 6 बस, 28 फेऱ्या, 1299 किमी, चालक 8, वाहक 8. वैजापूर- 5 बस, 32 फेऱ्या, 1508 किमी, चालक 9, वाहक 9 कन्नड - 7 बस, 34 फेऱ्या, 1953 , चालक 13, वाहक 13 गंगापूर - 4 बस, 24 फेऱ्या, 1249 किमी, चालक 8, वाहक 8 सोयगाव- 4 बस, 16 फेऱ्या, 845 किमी, चालक 4, वाहक 4 अशा एकूण 29 बस आज ग्रामीण भागात मार्गस्थ असतील. एकूण 178 फेऱ्या होतील आणि यासाठी 48 वाहक आणि 48 चालक कामावर रुजू असतील. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून एसटी सेवा वाढवली जाऊ शकते.

नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात एसटी सेवा आजपासून सुरु होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चार एसटी आगारामार्फत ग्रामीण भागात ही बससेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यात नंदुरबार अक्कलकुवा शहादा आणि नवापूर आगारातून ग्रामीण भागात ही बस सेवा सुरु होईल. प्रत्येक आगारातून 50 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे

यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात 9 डेपो असून प्रत्येक डेपो मॅनेजर, मार्गावरील प्रवाशांच्या संख्येने बस पाठवणार आहे. त्यानुसार बसच्या फेऱ्या ठरणार आहेत. एका बसमध्ये 21 किंवा 22 प्रवासी प्रवास करतील. सकाळी 8 पासून सायंकाळी 7 पर्यंत या बस धावतील. सर्व प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बस स्वच्छ करुनच डेपोमध्ये दाखल होतील.

अमरावती अमरावती जिल्ह्यात 8 एसटी डेपो आहेत. त्यामधून अमरावती आणि बडनेरा ही महानगरपालिका क्षेत्र असून हा रेड झोन असल्याने ह्या दोन डेपोमधून एकही बस धावणार नाही. उरलेल्या 6 डेपोमधून बस धावणार आहेत. परतवाडा, वरुड, चांदुर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदुर बाजार या 6 डेपोमधून 61 बसच्या 547 फेऱ्या होणार आहेत.

एसटी प्रवासाची नियमावली

- प्रवासाच्या माहिती नियंत्रण कक्ष सुरु करा - एसटी अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध करा - विविध विभागांशी संपर्क साधून प्रवासाचे मार्ग ठरवा - प्रवाशांनी प्रवासाआधी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावं - प्रशासनाने प्रवाशाच्या प्रवासाची माहिती घ्यावी - सोडण्यात येणाऱ्या बससाठी प्रवाशांचे गट करावे - बस सुटण्याचे ठिकाण ते शेवटचे ठिकाण असाच प्रवास असावा - प्रवाशांना मधल्या थांब्यांबवर उतरता येणार नाही - प्रवास सुरु होण्याआधी बसचं निर्जंतुकीकरण करावं - प्रवाशांनी संपूर्ण प्रवासात मास्क घालणं अनिवार्य - बसमध्ये प्रवेशाआधी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत - प्रवाशांनी वैद्यकीय प्रमाणपत्र, आधार कार्ड सादर करावं - बसमध्ये दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावं - एका सीटवर एकच प्रवासी बसेल याची काळजी घ्यावी - बसमधील प्रवाशांची ती प्रतींमध्ये यादी करावी - प्रवासानंतर प्रवाशांना नोडल ऑफिसरच्या ताब्यात द्यावं - आगार व्यवस्थापकांनी परतीच्या प्रवासाची व्यवस्था करावी - परतीच्या प्रवासाआधी बसचं निर्जंतुकीकरण करावं

Lockdown 4.0 | उद्यापासून जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Embed widget