एक्स्प्लोर

एलआयसीची विमाधारकांना साथ, प्रिमियम भरण्याच्या मुदतवाढीसह 'या' महत्वाच्या घोषणा

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर एलआयसीने देखील आपल्या विमाधारकांना दिलासा दिला आहे. एलआयसीने विम्याचे मार्च आणि एप्रिलमधील हप्ते भरण्यासाठी 30 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

मुंबई : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर बँकांचे हफ्ते भरण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीच्या घोषणेनंतर आता 'जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी' असं म्हणणाऱ्या भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) विम्याचे मार्च आणि एप्रिलमधील हप्ते भरण्यासाठी 30 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. तसेच कोरोनामुळे विमाधारकाचा मृत्यू ओढवल्यास अन्य प्रकरणांप्रमाणेच भरपाईचा दावा प्राधान्याने स्वीकारून वारसाला भरपाईची रक्कम तातडीने दिली जाईल, असे देखील म्हटले आहे. एलआयसीने कोविड-19 महामारीमुळे देशभरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पॉलिसीधारकांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. एलआयसीनं म्हटलं आहे की, फेब्रुवारी महिन्याच्या प्रीमियमसाठी दिलेला वाढीव कालावधी 22 मार्चला संपणार आहे. आता ही अवधी 15 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. ज्या विमाधारकांच्या विम्याला आरोग्य तपासणीशिवाय फेरमुदत देता येणे शक्य आहे, त्या प्रकरणांत ऑनलाईन कार्यवाही केली जाईल. विम्याचे हप्ते भरताना एलआयसीच्या डिजिटल पेमेंट सुविधेसाठी कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही. आवश्यक माहिती संकेतस्थळावर दिल्यास विम्याचा हप्ता भरता येईल. एलआयसी पे डायरेक्ट हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करूनही हप्ता भरता येईल. नेट बँकिंग, कार्डद्वारे करा पेमेंट ज्यांना आपल्या प्रिमियमचं पेमेंट या काळात करायचं आहे त्यांच्यासाठी देखील एलआयसीने सोय केली आहे. नेट बॅंकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेटीएम, फोनपे, गूगल पे, भीम, यूपीआय या माध्यमातून ज्यांना प्रिमियम भरायचा आहे, ते भरु शकतात. तसेच आयडीबीआय बँक आणि अॅक्सिस बँकांच्या शाखांमध्ये आणि ब्लॉक स्तरावरील सेवा केंद्रांमध्ये (सीएससी) रोख रकमेद्वारे देखील प्रिमियम भरता येऊ शकते. Corona World Update | जगभरात कोरोनाचे जवळपास 17 लाख 80 हजार रुग्ण सर्वात महत्वाची बाब म्हणजे जर कोरोनामुळे विमाधारकाचा मृत्यू झाला तर अन्य प्रकरणांप्रमाणेच भरपाईचा दावा प्राधान्याने स्वीकारून वारसाला भरपाईची रक्कम तातडीने दिली जाईल, असे शनिवारी जाहीर करण्यात आले आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूमुळे आतापर्यंत 16 विमाधारकांच्या कुटुंबांना भरपाई देण्यात आल्याची माहिती एलआयसीकडून देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohini Khadse : आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
Congress Massajog to Beed Sadnabhavana Rally : काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
Telangana Tunnel Accident : तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vaibhavi Deshmukh:माझे काही बरेवाईट झाले तर आई, विराजची काळजी घे;वैभवी देशमुखचा जबाब 'माझा'च्या हातीNira Canal : नीरा उजवा कालव्यात मृत कोंबड्या आढळल्यानं खळबळ,सावधगिरी बाळगण्याचं रामराजेंचं आवाहनABP Majha Headlines : 8 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 08 March 2025 : Maharashtra News : ABP MajhaSantosh Deshmukh Case : देशमुख हत्या प्रकरणात 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब ठरले महत्त्वाचे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohini Khadse : आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
Congress Massajog to Beed Sadnabhavana Rally : काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
Telangana Tunnel Accident : तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
आजचा महिला दिन खास, 5 राशींचं नशीब उजळणार!
आजचा महिला दिन खास, 5 राशींचं नशीब उजळणार!
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Embed widget