एक्स्प्लोर

Corona World Update | जगभरात कोरोनाचे जवळपास 17 लाख 80 हजार रुग्ण

जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरुच असून आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17 लाख 80 हजार झाली आहे. तर कोरोनामुळे बळींची संख्या 1 लाख 8 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे चार लाख 3 हजार रुग्ण बरे झाले आहेत.

मुंबई : जगभरात कोरोनाचे जवळपास 17 लाख 80 हजार रुग्ण झाले आहेत. जगभरात कोरोनामुळे गेलेल्या बळींची संख्या 1 लाख 8 हजारांवर (10771) गेली आहे. तर चार लाख 3 हजार रुग्ण बरे झाले आहेत, अजून जवळपास 12 लाख 68 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे 50 हजार 590 गंभीर आहेत.

अमेरिकेने 20  हजार बळींचा आकडा ओलांडला

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. अमेरिकेत 20 हजार बळींचा आकडा ओलांडला गेला आहे. गेल्या 24 तासात 1830 बळी अमेरिकेत गेले आहे. आता अमेरिकेत एकूण बळींची संख्या 20 हजार 577 वर पोहोचली आहे तर  रुग्णांची संख्या पाच लाख 33 हजारांवर गेली आहे.

न्यूयॉर्क प्रांतात काल 783 बळी, तिथे रुग्णांची संख्या1 लाख 81हजार तर एकूण मृतांचा आकडा 8627 इतका आहे.

त्या खालोखाल न्यूजर्सीत 2183, मिशिगन मध्ये 1392, लुझियाना 806, इलिनॉईस 677, कॅलिफोर्निया 630 आणि वॉशिंग्टनमध्ये 494 लोकांचा बळी या रोगाने घेतलाय.

गेल्या 11 दिवसात अमेरिकेने तब्बल 15 हजार 492 लोक गमावले.

 स्पेनमध्ये गेल्या चोवीस तासात ५२५ लोक गमावले आहेत. एकूण मृतांचा आकडा १६ हजार ६०६ वर पोहोचला आहे. गेल्या अकरा दिवसात स्पेनने ८ हजार १४२ लोकं गमावली आहेत.

तर काल इटलीत ६१९ माणसांचा बळी घेतला. आता इटलीतील एकूण बळींची संख्या १९ हजार ४६८ इतकी झाली आहे. काल रुग्णांची संख्या 7  हजार सातशेने वाढली,  इटलीत आता जवळपास १ लाख ५२ हजार रुग्ण आहेत. 

इंग्लंडमध्ये काल दिवसभरात ९१७ लोकांचा जीव गेला, तिथला बळीचा आकडा ९,८७५ वर पोहोचला आहे.

फ्रान्सने काल दिवसभरात ६३५ लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत १३ हजार ८३२ बळी गेले आहेत तर एकूण रुग्ण १ लाख ३० हजारांच्या वर गेले आहेत.

जर्मनीत काल १३५ बळी गेले आहेत तर एकूण बळींची संख्या २,८७१ इतकी झाली आहे.

इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल १२५ ची भर पडली. इराणमध्ये एकूण ४,३५७ मृत्यू झाले असून रुग्णांची संख्या ७०,०२९ च्या वर पोहोचली आहे.

कोरोनाने बेल्जियममध्ये काल ३२७ मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा ३,३४६ वर पोहोचला आहे.

हॉलंडमध्ये काल १३२ बळी घेतले तिथे एकूण २,६४३ लोक दगावले आहेत.

टर्की ११०१,  ब्राझील ११४०, स्वित्झर्लंडने १,०३६, स्वीडनमध्ये ८८७, पोर्तुगाल ४७०, कॅनडात ६५३, इंडोनेशिया ३२७, तर इस्रायलमध्ये १०० बळी कोरोनामुळे गेले आहेत.

दक्षिण कोरिया  काल ३ मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा २११ वर पोहोचला आहे.

आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या ५,०११ वर पोहोचली आहे, तिथे ८६ लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

गेल्या २४ तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये ८०,२१८ तर बळींच्या आकड्यात  ६,०८३ ची भर पडली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Beed Case | कोणी धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही- फडणवीसGliding Center Vastav EP 120 | ग्लायडींग सेंटरच्या अडीच हजार कोटींच्या जागेच्या खाजगीकरणाचा प्रयत्नNitin Bikkad on Suresh Dhas:मी वाल्मिक कराडांना कधीच भेटलो नाही,बिक्कडांना फेटाळे सुरेश धसांचे आरोपAPMC Kesari Mango : 5 डझानाच्या पेटीला 15 हजारांचा भाव, APMCत आंब्याची पहिली पेटी दाखल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
Embed widget