एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पनवेल महापालिका निवडणुकीत घराणेशाही
पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या मुलांना उमेदवारी मिळवून दिली आहे. विशेष म्हणजे मुलींच्याही खांद्यावर घराणेशाईचा झूल टाकण्यात आली आहे. सर्वच पक्षांची ही अवस्था असल्याने पनवेल निवडणुकीच्या निमित्ताने घराणेशाहीचा उदय होताना दिसतो आहे.
पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय नेत्यांच्या मुलांनी सक्रीय राजकारणात भाग घेतला आहे. यात सर्वात वर नाव आहे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा लहान मुलगा परेश ठाकूर आणि शेकापचे माजी नगराध्यक्ष जे ए म्हात्रे यांचा मुलगा प्रीतम म्हात्रे यांचा.
परेश ठाकूर हे प्रभाग क्रमांक 19-ब मधून निवडणूक लढवत आहेत, तर प्रीतम म्हात्रे हे प्रभाग क्रमांक 18 मध्ये उभे आहेत. परेश ठाकूर यांच्यामागे रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर याचं नाव तर प्रीतम म्हात्रे यांच्या मागे जे एम म्हात्रे यांच नाव असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याची तेही मान्य करतात. वडील असले तरी आपण आपल्या कामाच्या जोरावर राजकारणात स्थित होण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
या दोघांप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल अध्यक्ष सुनील घरत यांची मुलगी शिवानी घरत, शिवसेना रायगड जिल्हाध्यक्ष बबन पाटील यांचा मुलगा कैलास पाटील, काँग्रेस चे नेते श्याम म्हात्रे यांची मुलगी श्रुती म्हात्रे यांनाही उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे
घराणेशाईची परंपरा फक्त मुलेच चालवत नसून मुलीही त्यात आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या सर्वांनीच आपापला जोरदार प्रचार सुरु केला आहे. मात्र ही घराणेशाही असल्याचं मात्र त्यांना मान्य नाही. आपण अनेक वर्ष पक्षाचं काम करत असून या कामाची दाखल घेऊन पक्षाने आपल्याला तिकीट दिलं असल्याचं या सर्वांचं म्हणनं आहे.
या सर्व उमेदवारांनी घराणेशाहीचा आरोप जरी फेटाळला असला तरी मतदारांना ही घराणेशाही किती रुचेल हे निवडणुकीच्या निकालात स्पष्ट होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement