एक्स्प्लोर
गेल्या 24 तासात महाराष्ट्रातून साडे अकरा कोटी जप्त
मुंबई: राज्यात 4 ठिकाणी नव्या जुन्या नोटांचं मोठ घबाड सापडलं. मुंबईतल्या टिळक नगरमध्ये कारमधून 10 कोटीच्या जुन्या नोटा आणि 10 लाखांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
ही रक्कम विद्यानाथ अर्बन बँकेची असल्याचं सांगण्यात येतं आहे. तिकडे पुण्यातील कोरेगावमध्ये नव्या दोन हजार आणि पाचेशच्या 14 लाखाच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं.
दुसरीकडे वसईत शिवसेना नगरसेवक धनंजय गावडेंच्या गाडीतून 11 लाखाच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच नालासोपऱ्यात एका व्यापाऱ्याकडून कोट्यवधींची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. तर कल्याणमध्ये पोलिसांनी व्यापाऱ्याकडून 21 लाखांच्या नव्या नोटा पकडल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement