एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निवडणुकीपूर्वी बेळगावात सात कोटींच्या बनावट नोटा जप्त
बेळगाव शहराच्या विश्वेश्वरय्यानगर परिसरात एका घरावर पोलिसांनी धाड टाकून नोटांचे घबाड जप्त केलं.
बेळगाव : बेळगाव पोलिसांनी मध्यरात्री एक वाजता धाड टाकून सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर बनावट नोटांचा साठा सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
बेळगाव शहराच्या विश्वेश्वरय्यानगर परिसरात एका घरावर पोलिसांनी धाड टाकून नोटांचे घबाड जप्त केलं. पोलिसांनी धाड टाकलेले घर हे सरकारी कर्मचाऱ्याचे निवासस्थान आहे. इथे 500 आणि 2000 च्या सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
पाचशेच्या 25,300 नोटा आणि दोन हजारांच्या 29,300 नोटा असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या प्रकरणी अजितकुमार निडोनी याला पोलिसांनी अटक केली असून तो मूळचा विजापूरचा आहे.
निवडणुकीत ग्रामीण भागात वाटण्यासाठी या बनावट नोटा आणण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement