एक्स्प्लोर

पोरासाठी बाप कधीही तयार असतो, जितेंद्र आव्हाड यांचा श्रीकांत शिंदे यांना टोला

मतदारसंघासाठी 25 कोटींचा निधी मिळावा म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी खेळीमेळीत का होईना पण श्रीकांत शिंदे यांच्या समोर स्टेजवरच हात देखील जोडले. 

 ठाणे : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत यांच्यात निधी मिळवण्याच्या विषयावरून शाब्दिक जुगलबंदी आज ठाण्याच बघायला मिळाली. आणि त्यामुळे उपस्थित नागरिकांची चांगलीच करमणूक झाली. आपल्या मतदारसंघासाठी 25 कोटींचा निधी मिळावा म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी खेळीमेळीत का होईना पण श्रीकांत शिंदे यांच्या समोर स्टेजवरच हात देखील जोडले. 

ठाण्यातील नगरसेवक उमेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारेगाव परिसरात महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या वीस दशलक्ष लिटर पाण्याच्या टाकीचे लोकार्पण आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे महापौर नरेश म्हस्के आणि इतर राजकीय नेते उपस्थित होते. लोकार्पणाच्या वेळी  या दोघांच्या जुगलबंदीची एक व्हिडीओ क्लिपच एबीपी माझाच्या हाती लागली आहे. सुरुवातीला जितेंद्र आव्हाड यांनी "निधी मागायचा असेल तर सरकारकडे जाण्यात अर्थ नाही, महानगरपालिकेकडे जाण्यात अर्थ नाही, यांच्याकडे ( श्रीकांत शिंदे ) जा, पोरासाठी बाप ( एकनाथ शिंदे ) कधीही तयार असतो, मी खूप प्रयत्न करून देखील पाण्याला निधी मिळत नव्हता, तो यांनी एका मिनिटात आणला, त्यासाठी त्यांचे लाख लाख आभार, आम्हाला काय, निधी मिळल्याशी मतलब", असे म्हणत एकाच वेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना टोला लगावला. 

तर त्याला ताबडतोब खासदारांनी प्रत्युत्तर दिले. "आव्हाड साहेबांचं मोठेपण आहे, त्यांच्याकडे गृह निर्माण विभाग आहे, मोठी मोठी कामं ते करतात, पण सर्व निधी शेवटी नगरविकास विभागाकडे येऊन थांबतो, मुंब्र्यात तुम्ही खूप मोठी काम केली आहेत, यापुढे देखील जेव्हा जेव्हा तुम्हाला निधी लागेल, तेव्हा तेव्हा नगर विकास विभाग तो देईल", असे शिंदे म्हणाले. त्यावर पुन्हा आव्हाड यांनी "गेली दोन वर्ष झाले 25 कोटी रुपये निधी मागतोय, आज देतो उद्या देतो असं सुरुये, ( श्रीकांत शिंदे यांना हात जोडत ) निधी मंजूर करून घ्यावा", असे मस्करीत म्हटले. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

Thane | MP श्रीकांत शिंदेंसमोर MLA जितेंद्र आव्हाडांनी जोडले हात - Jitendra Awhad vs Shrikant Shinde

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget