जळगाव जिल्ह्यात देशातील पहिलाच अनोखा प्रयोग, नागरिकांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद
प्रशासकीय कामासाठी नागरिकांना अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयकडे खेटे घालावे लागतात. पण आता नागरिकां घरबसल्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या तक्रारी सांगता येणार आहेत.

जळगाव : प्रशासकीय कामासाठी (Administrative work) नागरिकांना अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयकडे खेटे घालावे लागतात तरी काम होईलच याची शाश्वती नसते. यावर उपाय म्हणून जळगाव जिल्हा प्रशासनाने ( Jalgaon District Collector Office) घर बसल्या नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरसिंग सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केलेली ही सुविधा देशातील पहिल्यांदाच सुरु केल्याचे मानले जात आहे. पहिल्याच दिवशी या सुविधेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळालं.
नागरिकांना विविध सरकारी कामांसाठी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही
जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना विविध सरकारी कामांसाठी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. जिल्हा प्रशासनाने jalgaon.gov.in या संकेतस्थळावर "Communication of district administration with citizens through web room" या सुविधेची लिंक उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा सरकारी सुट्या वगळून सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 11 व 11.30 ते 12.30 अशा दोन सत्रांत उपलब्ध असेल. विशेष म्हणजे देशातील हा पहिलाच प्रयोग जिल्हा प्रशासनाने राबवला आहे. यामध्ये नागरिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व विविध विभागप्रमुखांशी थेट ऑनलाइन संवाद साधू शकतात आणि आपल्या तक्रारी मांडू शकतात. विशेषतः परराज्य व परदेशात असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही सुविधा लाभदायक ठरणार आहे. यामुळे वेळ आणि खर्च वाचणार असून, संवादाची गोपनीयता राखली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दिली.
लोकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देणं हा आमचा उद्देश : जिल्हाधिकारी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार 100 दिवसांचा कार्यक्रम सुरु आहे. त्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत लोकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देणं हा आमचा उद्देश आहे. अनेकांना लांबून जळगाव शहरात येणं शक्य होत नाही. त्यामुळं आम्ही डिजीटल रुम तयार केली आहे. यामध्ये 10 अधिकारी असणार आहेत, ते नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. नागरिकांच्या समस्या ते थेट मांडू शकतात अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. आठवडाभरात 10 तास ही सेवा देण्यात येणार आहे. लोकांचे प्रश्नांचा पाठपुरावा होऊन ते मार्गी लागावेत हाच आमचा उद्देश असल्याची माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
Jalgaon Chatai : जगात फेमस 'जळगाव चटई' उद्योग अडचणीत, GST आणि वाढलेल्या वीजदराचा निर्यातीला फटका, अनेक उद्योग बंद
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

