एक्स्प्लोर
खेळता खेळता फेवीक्विक डोळ्यात टाकलं, पापण्यांचे केस कापून डोळा उघडला
विशेष म्हणजे घरातील सर्वजण साखरपुड्याच्या कार्यक्रमात मग्न होते. मात्र वेदांतच्या प्रतापानं संपूर्ण कार्यक्रमावरच पाणी पडलं.
जळगाव: लहान मुलं काय करतील आणि काय नाही याचा नेम नाही.
जळगावच्या सोना नगरात 4 वर्षांच्या चिमुरड्याच्या प्रतापानं साऱ्यांच्याच काळजात धडकी भरवली. वेदांत पंडित या चिमुरड्यानं खेळता-खेळता फेवीक्विकचे 2 थेंब औषधाप्रमाणे डोळ्यात टाकले. सुदैवानं फेवीक्विक डोळ्यात न पडता केवळ पापण्यांवर पडले.
डोळा बंद झाल्यानं वेदांतनं आरडाओरडा सुरु केला. विशेष म्हणजे घरातील सर्वजण साखरपुड्याच्या कार्यक्रमात मग्न होते. मात्र वेदांतच्या प्रतापानं संपूर्ण कार्यक्रमावरच पाणी पडलं.
घाबरलेल्या पंडित परिवारानं डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी पापणीचे केस कापून डोळा उघडला. मात्र पंडित परिवाराला आयुष्यभराचा धडा मिळाला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
जळगाव शहरातील सोना नगरात पंडित कुटुंब राहतं. त्यांच्या घरी शुक्रवारी साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे घरी पाहुण्यांची लगबग आणि कुटुंबीयांची धावपळ सुरु होती.
एकीकडे ही धावाधाव सुरु असताना, दुसरीकडे लहान मुलांचा खेळ सुरु होता. त्यावेळी चार वर्षाच्या वेदांतच्या हाती फेवीक्विक लागलं. त्याने ते हाती घेऊन, स्वत:च्याच डोळ्यात औषधाप्रमाणे टाकले.
मात्र डोळे ऐनवेळी मिटल्याने, फेवीक्विकचे थेंब पापण्यांवर पडले. यानंतर क्षणार्धात पापण्या एकमेकाला चिटकून डोळा बंद झाला. डोळा उघडत नसल्याने वेदांतने रडण्यास सुरुवात केली.
त्यावेळी कुटुंबातील सदस्य धावत त्याच्याकडे आले. वेदांतला विचारपूस केल्यानंतर, आपण फेवीक्विक डोळ्यात टाकल्याचं सांगितलं. त्यानंतर घरातील मंडळींनी वेदांतचा डोळा घरीच उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश न आल्याने, घाबरलेल्या पंडित परिवाराने साखरपुडा बाजूला ठेवून, जिल्हा रुग्णालय गाठलं.
डॉक्टरांनी तपासणी केल्यावर फेवीक्विक केवळ पापण्यांवर पडून त्या चिकटल्याचे लक्षात आलं. डॉक्टरांनी पापण्यावरील केस कापले. त्यामुळे वेदांत डोळा उघडू शकला.
वेदांतने डोळा उघडल्याचं पाहून, कुटुंबियांच्या जीवात जीव आला. मात्र झालेल्या या प्रकारामुळे त्यांनी आयुष्याचा धडा घेतला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement