एक्स्प्लोर
Advertisement
बाळासाहेब ठाकरेंना अटक केली ते चुकलंच, अजित पवारांची कबुली
शरद पवारांची ईडी चौकशी राजकीय सूडाच्या भावनेपोटी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला होता. या आरोपाला सडेतोड उत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांना झालेल्या अटकेची आठवण करुन दिली होती.
मुंबई : शरद पवारांची ईडी चौकशी राजकीय सूडाच्या भावनेपोटी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला होता. या आरोपाला सडेतोड उत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांना (दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे) झालेल्या अटकेची आठवण करुन दिली. यावर उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन मंत्री अजित पवार म्हणाले की, बाळासाहेबांना झालेली अटक अयोग्य होती.
अजित पवार एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या मुलाखतीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी अजित पवारांना उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, बाळासाहेबांना झालेली अटक अयोग्य होती. आमच्या मंत्रीमंडळातील काही वरीष्ठांच्या हट्टापायी ही अटक झाली होती. आम्ही त्यास विरोध केला होता. इतक्या टोकाचं राजकारण कोणी करू नये, असं आम्ही सांगितलं होतं. परंतु त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. त्यामुळे आम्ही तो निर्णय मागे घ्यायला लावू शकलो नाही.
अजित पवार म्हणाले की, बाळासाहेबांसोबत जे केलं, तसं कोणाच्याच बाबतीत करू नये. असं का करताय? असा सवाल आम्ही त्यावेळी संबंधित वरिष्ठांना विचारला होता. परंतु ते म्हणाले, आम्ही या विभागाचे प्रमुख आहोत, आम्हाला जे योग्य वाटतंय तो निर्णय घेणार आहोत. तुम्ही यात लक्ष घालू नका.
...तर पवारांची औलाद सांगणार नाही : अजित पवार
अजित पवारांनी भरसभेत फोन उचलला, "माईक चालू राहू दे आपलं सगळं उघड असतं" | इंदापूर | ABP Majha
वाचा : ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादीची आघाडी, अविनाश जाधवांचा मार्ग मोकळा
काँग्रेसमुळे राज ठाकरेंना महाआघाडीत घेऊ शकलो नाही : अजित पवार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement