एक्स्प्लोर
Advertisement
2018 साली लग्नाचे फारच कमी मुहूर्त, पंचांगकर्त्यांची माहिती
चातुर्मास आणि अधिक मासामुळे तब्बल 4 ते 5 महिने लग्नाचे मुहूर्त नाहीत. यंदाच्या तुलनेत पुढच्या वर्षी तब्बल 20 ते 22 मुहूर्त कमी आहेत.
मुंबई : पुढच्या वर्षी ज्यांचा लग्नाचा प्लॅन आहे, त्यांनी एकतर घाई करा किंवा अजून एखादं वर्ष वाट पाहा. कारण चातुर्मास आणि अधिक मासामुळे तब्बल 4 ते 5 महिने लग्नाचे मुहूर्त नाहीत. यंदाच्या तुलनेत पुढच्या वर्षी तब्बल 20 ते 22 मुहूर्त कमी आहेत. पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी ही माहिती दिली आहे.
पौष महिन्यात अर्थात नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात एकही मुहूर्त असणार नाही. तर अधिक ज्येष्ठ मास येत असून तो 16 मे ते 13 जून दरम्यान आहे. या कालावधीतही कुठलाही शुभमुहूर्त नसल्याचं सोमण यांनी सांगितलं आहे. मात्र, काही जण आपल्या वेळ आणि सोयीनुसार मुहूर्त काढून शुभकार्य उरकू शकतात.
दरम्यान, २०१७ या वर्षातील उर्वरित नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्येही मिळून अद्याप १० विवाह मुहूर्त शिल्लक आहेत. त्यामुळे आता कार्तिकी एकादशीनुसार सुरु होणारी लगीनसराई ही या वर्षअखेरपर्यंत चालू राहणार आहे.
2018मधील लग्नाचे मुहूर्त कोणते?
फेब्रुवारी - ५, ९, ११, १८,
१९, २०, २१, २४
मार्च- ३, ४, ५, ६, १२, १३,१४
एप्रिल- १९, २०, २४, २५, २६, २७, २८,३०
मे- १,२,४,६,७,८,९,११,१२
जून - १८,२३,२८,२९
जुलै - २,५,६,७,१०,१५
डिसेंबर - २, १३, १७, १८, २२, २६, २८,२९, ३०,३१
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement