एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
देवेंद्र फडणवीसांनी दिले पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. यावेळी फडणवीस यांच्या अभिनंदनावरुन सभागृहात चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळाला.
![देवेंद्र फडणवीसांनी दिले पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत i will come back says former cm devendra fadnavis in maharashtra assembly देवेंद्र फडणवीसांनी दिले पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/01170453/fadanvis.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आपल्यावरील अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जोरदार भाषण केलं. मी पुन्हा येईन म्हणालो होतो, पण वेळापत्रक सांगितलं नव्हतं, त्यामुळे वाट पाहा...अशा शेलक्या शब्दात त्यांनी त्यांच्यावरील टीकेला उत्तर दिलं. "मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूँ लौटकर जरूर आऊंगा, असं सांगत फडणवीसांनी पुन्हा सत्तेत येण्याचे संकेतही दिलेत. ते विधानसभा सभागृहात बोलत होते.
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. यावेळी सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह सभागृहाच्या सदस्यांनी अभिनंदनपर भाषणे केली. अभिनंदनाच्या ठरावाला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांचा शायराना अंदाजही उपस्थितांना पाहण्यास मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी, जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध आहेत. 'जनतेकडून त्यांच्या मनात ज्या आशा, आकांक्षा, अपेक्षा आहेत; तसेच मुख्यमंत्र्यांच्याही मनातही राज्यातील जनतेविषयी काही योजना असतील, त्या सर्वांसाठी आम्ही त्यांना सहकार्य करू, असं माजी मुख्यंमंत्री देवंद्र फडणवसी म्हणाले.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची आज होणारी निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावरही फडणवीस यांनी अभिनंदनपर भाषण केले. यावेळी नाना पटोले यांना सर्व पक्षाचा अनुभव आहेत, ते सगळीकडे होते. अध्यक्ष हा सर्वांचा असतो, त्यामुळं ते विरोधीपक्षालाही न्याय देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावर, अध्यक्षाला सर्वांचा अनुभव असायला हवा, असं उत्तर नाना पटोले यांनी दिलं. तर, आता अध्यक्षांनी डाव्या बाजून जास्त ऐकावं, उजव्या बाजूनं कमी, डाव्या बाजूला जास्त पाहावं, उजव्या बाजूला कमी, असाही सल्ला फडणवीस यांनी अध्यक्षांना दिला.
संबंधित बातम्या :
सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा : आमदार बच्चू कडू
मी पुन्हा येईन म्हणाले, पण कुठे बसणार ते सांगितलं नव्हतं; जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
'मी इथे येईन' असं म्हणालो नव्हतो तरी आलो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टोलेबाजी
Devendra Fadnavis | विरोधी पक्षाकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंचं केलं अभिनंदन | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)