एक्स्प्लोर

'मी इथे येईन' असं म्हणालो नव्हतो तरी आलो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

तुमची आमची युती नव्हती त्यावेळीही आमचं हिंदुत्व होतं. आजही आहे, काळी होतं, उद्याही ते कायम राहील, पण त्या हिंदुत्वात दिलेला शब्द पाळणं हे देखील हिंदुत्व आहे. जय श्रीराम म्हणायचं आणि दिलेलं वाचन तोडायचं हे माझं हिंदुत्व नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

 मुंबई :  विरोधी पक्ष आस्तित्वात राहणार नाही कारण विरोधी पक्षातले माझे मित्रच आहेत. इथं यायला भाग्य असावं लागतं. मी भाग्याने इथं आलोय.  'मी इथे येईन' असं म्हणालो नव्हतो तरी आलो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत टोलेबाजी  केली. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर ते बोलत होते. तुम्ही मुख्यमंत्री झाल्यांनतर आम्ही विरोधी पक्षात होतो, तुमची आमची युती नव्हती त्यावेळीही आमचं हिंदुत्व होतं. आजही आहे, कालही होतं, उद्याही ते कायम राहील, पण त्या दिलेला शब्द पाळणं हे हिंदुत्व आहे. जय श्रीराम म्हणायचं आणि दिलेलं वाचन तोडायचं हे माझं हिंदुत्व नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले. मी भाग्यवान आहे, जे विरोधात होते ते मित्रपक्ष झाले, जे मित्रपक्ष होते ते विरोधी पक्षात आले, असेही ते म्हणाले. यावेळी ठाकरे म्हणाले की, आपला परिचय आधी हाती आला असता तर बरं झालं असतं. आमच्याकडे बंद दाराआड आणि कानात काय बोललो हे सांगण्याची पद्धत नाही. आमची तशी संस्कृती नाही. अनेक वर्ष आपण सोबत आहोत. सभागृहात लावलेल्या महापुरुषांच्या तसविरींकडून आपण प्रेरणा घ्यायची. त्या फक्त प्रतिमा नाहीत तर ते विचार आहेत, असे ठाकरे म्हणाले. इथं यायला भाग्य असावं लागतं. मी भाग्याने इथं आलोय. मी इथं येईन असं मी कधीही बोललो नव्हतो, तरीही मी इथं आलो. आपण नवीन काहीतरी करू, असे ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी विरोधकांनी केली. तो कोरा करायचाच आहे. सातबारा कोरा केला नाही तर आपण जनतेचे गुन्हेगार ठरू. मला शेतकऱ्याला चिंतामुक्त करायचं आहे. सगळे दिग्गज सोबत आहेत. सगळं काम पूर्ण करू, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, देवेंद्रजी तुमची माझी मैत्री आहे. देवेंद्रजी आम्ही तुमच्यासारख्या मित्रांकडून मी खूप काही शिकलेलो आहोत. तुमची आणि माझी मैत्री आम्ही कुठेही लपवलेली नाही. तुमची माझी मैत्री आहे आणि त्यात कधीही अंतर येणार नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळी माझा एक मित्र मुख्यमंत्री झालाय याचा आम्हाला आनंद झाला. गेल्या पाच वर्षात आम्ही एकदाही दगा देण्याचा प्रयत्न केला नाही. तुमच्या कुठल्याही कामाच्या आड आम्ही आलो नाही. माझी माझ्या सगळ्या सदस्यांना सक्त ताकीद होती की कपट कारस्थान करायचं नाही, काळोखात काही करायचं नाही, मध्यरात्रीची खलबतं करायची नाही, माझा मित्र समोर विरोधी पक्षात बसला आहे. तुम्ही सोबत असता तर आज मी हा कारभार घरी बसून टीव्हीवर पाहिला असता,असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड  विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. भाजपचे विधिमंडळ गटनेते असलेल्या फडणवीस यांचेच नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी आल्याने त्यांच्या नावाची घोषणा विरोधी पक्षनेते म्ह्णून करण्यात आली. संबंधित बातम्या 
 विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड  

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले बिनविरोध, भाजपकडून उमेदवारी अर्ज मागे 

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
Horoscope Today : आज घटस्थापनेचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? देवी दुर्गेची कृपा कोणत्या राशींवर? आजचे राशीभविषिय
आज घटस्थापनेचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? देवी दुर्गेची कृपा कोणत्या राशींवर? आजचे राशीभविषिय
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget