घरबांधणी अग्रिम योजना पुन्हा सुरू होणार, राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना होणार लाभ
पोलिसांची ( Police ) घर बांधणी अग्रीम योजना (Housing Advance Plan) पुन्हा सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना आता बँकांकडे जाण्याची गरज पडणार नाही.
मुंबई : अनेक दिवसांपासून बंद असलेली पोलिसांची ( Police ) घर बांधणी अग्रीम योजना (Housing Advance Plan) पुन्हा सुरू होणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने घेतलेला निर्णय महाविकास आघाडी सरकार बदलणार असून ही योजना लवकरच सुरू होणार आहे.
तत्कालीन फडणवीस सरकारने 2017 मध्ये अग्रीम योजना बंद करून खासगी एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेकडे ही कर्ज योजना वर्ग केली होती. परंतु, यात बदल करून राज्य सरकार घर बांधणी अग्रिम योजनेतून थेट पैसे लाभार्थ्यांना देणार आहे. महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आघाडी सरकारच्या या निर्णयाचे पोलीस कर्मचाऱ्यांतून स्वागत केले जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना आता बँकांकडे कर्ज मागणीसाठी जाण्याची गरज पडणार नाही. या योजनेमुळे राज्य सरकारचे वर्षाला 36 कोटी रुपये वाचणार आहेत. दरवर्षी राज्य सरकारला अधिकचे 36 कोटी रुपये बँकांना देण्यासाठी मोजावे लागत होते. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील ताण कमी होणार आहे.
दरम्यान, तत्कालीन फडणवीस सरकारने ही योजना बंद केल्यानंतर बँकाच्या हितासाठी हा निर्णय घेत असल्याची टीका त्यांच्यावर झाली होती. पोलीस कर्मचाऱ्यांमधूनही त्यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या
- होय, आमच्यात मतभेद होते, पण... एन डी पाटलांच्या आठवणीने शरद पवारांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या
- Crime News : भारताची बॉर्डर क्रॉस करण्याआधीच पोलिसांचा घेराव; 48 तासांत आतंरराष्ट्रीय टोळी जेरबंद
- समुद्रात बेकायदेशीर डिझेल विक्री करणाऱ्या टोळीला अटक, नवी मुंबई पोलिसांना कारवाई
- मुंबईने तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू ओलांडला, टास्क फोर्स तज्ज्ञांचे अनुमान; सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्येत घट