एक्स्प्लोर

पत्नीचा सूड उगवण्यासाठी पतीकडून अश्लील फोटो फेसबुकवर

गणेशने पत्नीच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट उघडलं. त्यावर त्याने अश्लील चित्र आणि घाणेरडे मेसेज टाकून पत्नीची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

हिंगोली : विभक्त पत्नीचा सूड उगवण्याच्या द्वेषातून पतीने हीन पातळी गाठली. माहेरी राहणाऱ्या पत्नीच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करुन त्यावर पतीने अश्लील चित्र आणि मेसेज टाकल्याची घटना हिंगोलीत उघडकीस आली आहे. हिंगोलीतील डोणवाडा भागात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीचा विवाह 31 मार्च 2016 रोजी कळमनुरी तालुक्यातील भाटेगावातील गणेश मुंगावकर याच्याशी झाला होता. सासरची मंडळी पैशासाठी त्रास देतात आणि पती नांदवत नाही, म्हणून ती माहेरी राहत होती. सात महिन्यांपूर्वी गणेशने पत्नीच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट उघडलं. त्यावर त्याने अश्लील चित्र आणि घाणेरडे मेसेज टाकून पत्नीची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तक्रारदार महिला परभणीत शिक्षण घेत असलेल्या नर्सिंग कॉलेजमध्ये जाऊनही त्याने बदनामी केली. गणेशने पत्नीच्या आईच्या मोबाईलवरही अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. या प्रकाराला वैतागून आरोपी पतीविरोधात पत्नीने पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. या प्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा पोलिस ठाण्यात सायबर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget