एक्स्प्लोर

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण; आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विक्की नगराळेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपीला त्याच्या मुलीची आणि पत्नीची आठवण येत आहे. त्यांना भेटण्यासाठी तो विनंती करत आहे.

वर्धा : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विक्की नगराळेला आज न्यायालयात हजर करण्यात आहे. न्यायालयाने आरोपीची न्यायलयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलिसांनी आज न्यायलयाकडे आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे विक्की नगराळेला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

विक्की नगराळेविरोधात राज्यभरातील नागरिकांच्या मनात तीव्र संताप आहे. त्या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आरोपीला सकाळीच 6 वाजता न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयीन कोठडीत पाठवताना पुढे गरज भासल्यास पोलीस कोठडी मागू, असं पोलिसांनी आज न्यायालयात सांगितलं आहे.

धक्कादायक! वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

पोलीस कोठडीची मागणी का केली नाही?

न्यायालयीन कोठडी मागण्याचं मुख्य कारण म्हणजे आरोपीची ओळख परेड साक्षीदारांमार्फत करुन घेणे. ही ओळख परेड करुन घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. पोलीस कोठडीत आरोपी असताना ओळख परेड घेता येत नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत पाठवून ओळख परेड घेतली जाणार आहे.

आरोपी विक्की नगराळेला येतेय मुलगी आणि पत्नीची आठवण

हिंगणघाटमध्ये एका लेकीला जाळणाऱ्या आरोपी विक्की नगराळेला आता त्याच्या लेकीची आठवण येत आहे. घटना घडण्याच्या 12 दिवस आधीच आरोपी विक्की मुलीचा बाप झाला होता. आता आरोपीला त्याच्या मुलीची आठवण येते आहे. मला माझ्या मुलीला आणि पत्नीला एकदा भेटू द्या, अशी विनंती तो पोलिसांना करत आहेत.

दरम्यान, आरोपीने घटनेसाठी वापरलेलं सर्व साहित्य जप्त केलं आहे. यामध्ये घटनेच्या वेळी त्याने घातलेले आणि नंतर लपवलेले कपडे आणि शूज, पेट्रोलची बॉटल कापण्यासाठी वापरलेले कटर, आग लावण्यासाठी वापरलेलं लायटर हे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. शिवाय घटनेच्या वेळी आरोपीच्या खिशात फक्त 30 रुपये होते, ते देखील जप्त करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हार्दिक पांड्याला दबावाखाली विश्वचषकात स्थान मिळाले? जय शाह यांनी काय दिल्ले उत्तर
हार्दिक पांड्याला दबावाखाली विश्वचषकात स्थान मिळाले? जय शाह यांनी काय दिल्ले उत्तर
भिंडेंच्या वकिलाचा वादळी युक्तिवाद; घाटकोपर दुर्घटनेवेळी वाऱ्याचा वेग ताशी 96 किमी
भिंडेंच्या वकिलाचा वादळी युक्तिवाद; घाटकोपर दुर्घटनेवेळी वाऱ्याचा वेग ताशी 96 किमी
Prakash Ambedkar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ही मानवनिर्मित, मृत्यूला BMC जबाबदार : प्रकाश आंबेडकरांचा आरोप
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ही मानवनिर्मित, मृत्यूला BMC जबाबदार : प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात फडवणवीसांना जावईशोध कधी लागला आणि तो शोध पंतप्रधानांना का सांगितला नाही? : पृथ्वीराज चव्हाण
सिंचन घोटाळ्यात फडवणवीसांना जावईशोध कधी लागला आणि तो शोध पंतप्रधानांना का सांगितला नाही? : पृथ्वीराज चव्हाण
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Ajit Pawar : सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य, पण अजितदादा दोषी नाहीतShivaji Park Security Tightened : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत भव्य सभा; पोलिसांचा चोख बंदोबस्तDevendra Fadnavis : Uddhav Thackeray यांच्या भाषणातून हिंदू शब्द गायब झाला, फडणवीसांचा घणाघातPrithviraj Chavan : Raj Thackeray यांनी महायुतीचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय,पृथ्वीराज चव्हाणांची जहरी टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हार्दिक पांड्याला दबावाखाली विश्वचषकात स्थान मिळाले? जय शाह यांनी काय दिल्ले उत्तर
हार्दिक पांड्याला दबावाखाली विश्वचषकात स्थान मिळाले? जय शाह यांनी काय दिल्ले उत्तर
भिंडेंच्या वकिलाचा वादळी युक्तिवाद; घाटकोपर दुर्घटनेवेळी वाऱ्याचा वेग ताशी 96 किमी
भिंडेंच्या वकिलाचा वादळी युक्तिवाद; घाटकोपर दुर्घटनेवेळी वाऱ्याचा वेग ताशी 96 किमी
Prakash Ambedkar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ही मानवनिर्मित, मृत्यूला BMC जबाबदार : प्रकाश आंबेडकरांचा आरोप
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ही मानवनिर्मित, मृत्यूला BMC जबाबदार : प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात फडवणवीसांना जावईशोध कधी लागला आणि तो शोध पंतप्रधानांना का सांगितला नाही? : पृथ्वीराज चव्हाण
सिंचन घोटाळ्यात फडवणवीसांना जावईशोध कधी लागला आणि तो शोध पंतप्रधानांना का सांगितला नाही? : पृथ्वीराज चव्हाण
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Alka kubal :अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
Kiran Mane :  लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या पक्षाकडून आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या पक्षाकडून आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
Rakhi Sawant Health Updates : रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
Embed widget