एक्स्प्लोर

Mansukh Hiren | सचिन वाझे यांना अडचणीत आणणारे 'हे' सहा मुद्दे....

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren death case) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) आता चांगलेच अडचणीत आले असून त्यांची बदली केली जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. 

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे चांगलेच अडचणीत आले आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्कॉर्पिओ गाडी सापडली होती, त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. विरोधी पक्षांनी हिरन यांच्या मृत्यूचा संशंय थेट सचिन वाझे यांच्यावर घेतला आहे आणि त्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यावर आता राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. 

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात येणार आहे. गृहंमत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत घोषणा केली आहे. भाजपने सचिन वाझे यांच्या विरोधात सभागृहात कालपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. आजदेखील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली. सचिन वाझें यांच्या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली. 

या प्रकरणाशी संबंधित सहा महत्वाच्या गोष्टी या एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असणारे सचिन वाझे यांना अडचणीत आणणाऱ्या आहेत. 

1. या प्रकरणामध्ये मनसुख हिरनची गाडीचा वापर झाल्यामुळे सचिन वाझेची अडचण वाढली. कारण सचिन वाझे हे मनसुखला आधीपासून ओळखत होते. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केली की सचिन वाझे यांच्या वॉट्स अॅप कॅालचा सीडीआर काढला तर या प्रकरणाचे सचिन वाझे कनेक्शन समोर येईल. 

2. मनसुख हिरनच्या पत्नीने केलेले आरोप

मनसुख हिरन यांच्या पत्नी विमला हिरनने एटीएसला दिलेल्या जबाबामध्ये असं म्हंटलं आहे की मनसुख हिरनची गाडी मागील चार महिन्यांपासून सचिन वाझे वापरत होते. तसंच विमला हिरन यांनी गंभीर आरोप करत एटीएसला माहिती दिली कि त्यांच्या पतीने त्यांना सांगितलं होतं की सचिन वाझे यांना या प्रकरणात अटक होण्यासाठी सांगितलं होतं. 

3. वकील अशिष गिरी यांच्या कार्यालयात तयार केला गेलेला तक्रार अर्ज
मनसुख हिरन यांच्या पत्नीने असाही आरोप केला आहे की सचिन वाझे यांच्या सांगण्यावरुनच त्यांच्या पतीने मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवलं होतं. या पत्राचा सगळा मजकूर सचिन वाझे यांच्या समक्ष तयार केला गेला. वकील अशिष गिरी हे टीआरपी केसमधील आरोपींचे वकील आहेत.  

4. धनंजय गावडे कनेक्शन
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की मनसुख हिरन यांचे शेवटचे लोकेशन वसई तुंगारेश्वर जवळच आहे. तिथेच धनंजय गावडे नावाच्या माझी शिवसेना पदाधिकाऱ्याचं फार्म हाऊस आहे. धनंजय गावडे आणि सचिन वाझे एकमेकांना ओळखतात आणि 2017 च्या एका खंडणीच्या केसमध्ये गावडे आणि वाझेसोबत आरोपी देखील आहेत असाही आरोप केला गेला आहे.

5. ओला टॅक्सी ड्रायव्हरचा जबाब
17 तारखेला ज्या दिवशी मनसुख यांची स्कॉर्पीओ गाडी चोरी केली त्या दिवशी मनसुखने दक्षिण मुंबईला जाण्यासाठी ओला टॅक्सी केली. ओला टॅक्सी ड्रायव्हर अब्दुल मोकिमने पोलिसांना सांगितलं की मनसुखने गाडी Crawford market साठी बुक केली होती. इथेच मुंबई पोलीस आयुक्तालयही आहे आणि तिथेच सचिन वाझे बसतात. अब्दुलने पोलिसांनी सांगितलं की Crawford market जवळ पोहचल्यानंतर मनसुख ने Crawford market ऐवजी सीएसटीच्या दिशेला गाडी वळवली. अब्दुलने पोलिसांनी सांगितलं की मनसुख फोनवर सतत कोणाशी तरी बोलत होता.

6. ठाणे कनेक्शन
अंबानी प्रकरणाचे सगळे कनेक्शन ठाण्याशी जुळतात. त्या रात्री गाडी ठाणे आणि मुंबईला आली आणि नंतर पांढरी इनोवा गाडी ठाण्यात परत गेली. गाडीचा मालक ठाण्याचा, मनसुखचा मृतदेहही ठाण्यात सापडतो आणि सचिन वाझे देखील ठाण्यातच राहायला आहेत.

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai BMC Budget 2025:  पालिकेची तिजोरी भरण्यासाठी मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार, बजेटमध्ये कचरा संकलन शुल्काच्या घोषणेची शक्यता
मुंबईकरांना नवा भुर्दंड, कचरा संकलन शुल्क लागणार? महापालिकेच्या बजेटमध्ये घोषणेची शक्यता
IPO Update:चामुंडा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा आयपीओ बोली लावण्यासाठी खुला होणार, किंमतपट्टा फक्त 50 रुपये, GMP कितीवर?
चामुंडा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा आयपीओ बोली लावण्यासाठी खुला होणार, किंमतपट्टा फक्त 50 रुपये, GMP कितीवर?
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या घरासाठी बुकिंग शुल्क भरलेल्या प्रत्येकाला घर मिळणार? 26 हजार घरांसाठी किती अर्ज, आकडेवारी समोर
सिडकोकडून मसुदा यादी प्रकाशित, बुकिंग शुल्क भरलेल्या प्रत्येकाला घर मिळणार? मोठं कारण समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 04 February 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMumbai Women Safety : मुंबईत महिला सुरक्षा वाऱ्यावर?पैशाचा तगादा लावल्यानं तरुणानं महिलेला संपवलं?ABP Majha Headlines : 11 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSantosh Deshmukh Beed : संतोष देशमुख हत्येचं प्रकरण, जातीयवादाचं वळण Rajkiya Sholey Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai BMC Budget 2025:  पालिकेची तिजोरी भरण्यासाठी मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार, बजेटमध्ये कचरा संकलन शुल्काच्या घोषणेची शक्यता
मुंबईकरांना नवा भुर्दंड, कचरा संकलन शुल्क लागणार? महापालिकेच्या बजेटमध्ये घोषणेची शक्यता
IPO Update:चामुंडा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा आयपीओ बोली लावण्यासाठी खुला होणार, किंमतपट्टा फक्त 50 रुपये, GMP कितीवर?
चामुंडा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा आयपीओ बोली लावण्यासाठी खुला होणार, किंमतपट्टा फक्त 50 रुपये, GMP कितीवर?
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या घरासाठी बुकिंग शुल्क भरलेल्या प्रत्येकाला घर मिळणार? 26 हजार घरांसाठी किती अर्ज, आकडेवारी समोर
सिडकोकडून मसुदा यादी प्रकाशित, बुकिंग शुल्क भरलेल्या प्रत्येकाला घर मिळणार? मोठं कारण समोर
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
Embed widget