Ajit Pawar : अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सरकारनं लवकरात लवकर भरीव मदत करावी : अजित पवार
नुकासनग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात सरकारच्या भूमिकेबाबत आज सभागृहात चर्चा होणं अपेक्षीत आहे. शेतकऱ्यांना सरकारनं भरीव मदत करावी असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं.
Ajit Pawar : नुकासनग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात सरकारच्या भूमिकेबाबत आज सभागृहात चर्चा होणं अपेक्षीत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीच्या संदर्भातील मुद्दा आम्ही सभागृहात उपस्थित केला असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर चांगली भरीव मदत सरकारनं द्यावी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. गोगलगायमुळं शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झालं आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील मदत करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान
दरम्यान, काल (22 ऑगस्ट) गोगलगायची लक्षवेधी सभागृहात लागली होती. त्याबाबत अनेक सदस्यांनी भूमिका मांडली आहे. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी भूमिका अजित पवारांनी मांडली. अतिवृष्टीनं, सोयाबीन, कापूस याचे मोठं नुकसान झालं आहे. तसेच अनेक ठिकाणचे रस्ते, पूल वाहून गेले असल्याचे अजित पवार म्हणाले. पूरग्रस्त भागाच्या संदर्भात सभागृहात आम्ही अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच मुद्दा उपस्थित केला होता. त्याबाबत आम्हाला उत्तर मिळाले नाही. आज त्याबाबत सरकार भूमिका मांडण्याची शक्यता असल्याचे अजित पवार म्हणाले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पहिली पेरणी, दुसरी पेरणी वाया गेली आहे. या नुकसानीबाबत आम्ही सभागृहात भूमिका मांडली आहे. पण सरकार आज याबाबात काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्वाचे ठारणार आहे. सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरिव मदत करावी अशी आमची मागणी असल्याचे अजित पवार म्हणाले.
आज महाविकास आघाडीची बैठक
महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. सायंकाळी सह पर्यंत ही बैठक सुरु होईल. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 20 जूननंतर राज्यात वेगळी राजकीय स्थित्यंतर घडलं. त्यानंतर आम्ही सर्वांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घरी भेट घेतली होती. परंतू, काल आमचे सगळ्यांचे ठरलं की सर्वांनी एक बैठक घ्यावी. विरोधक म्हणून आमच्यात एकी ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे अजित पवार म्हणाले. दरम्यान, सभागृहात चर्चा करत असताना कोणाही कोणाची वैयक्तिक निंदा करु नये. महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा, संस्कृती आहे. ती जपली पाहिजे. कटाकाक्षाने त्या बद्दल जागृह राहून काम करत असतो असे अजित पवार म्हणाले. बोलताना प्रत्येकानं मर्यादा ठेवली पाहिजे असे अजित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: