Vidarbha Flood : ऑगस्ट महिन्याचा प्राथमिक अहवाल सादर, 2 लाख हेक्टरपर्यंत पिकांचे नुकसान
कुही, मौदा आणि हिंगणा तहसीलमध्ये नुकसानीचा प्राथमिक अहवाल अद्याप मिळालेला नाही. भाजीपाला, मका, फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिकांसह नदी मातीपर्यंत वाहून गेली आहे.
- जुलैमध्ये 1.14 लाख हेक्टरचे नुकसान तर ऑगस्टमध्ये 82,936 हेक्टरची भर
नागपूरः जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 2 लाख हेक्टरचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. जुलै महिन्यात प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार 1.14 लाख हेक्टरमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, धान व इतर पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल सादर केला होता. संततधार पाऊस ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याअखेरपर्यंत सुरू होता. या मुसळधार पावसामुळे पुन्हा 82,936 हेक्टरमधील पीक खराब झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने दिला आहे.
सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत हे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सुमारे 70 टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. संत्रा, मोसंबी या फळबागांचा सर्वेक्षणात समावेश करण्यात आलेला नाही, त्याचा समावेश करण्याची मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी तुंबले असून झाडे पिवळी पडून कोमेजली आहेत.
Nitin Gadkari : अटलजी-अडवाणींसारख्या नेत्यांमुळं आज मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता : नितीन गडकरी
आकडा वाढण्याची शक्यता
आतापर्यंतच्या पाहणी अहवालानुसार एकूण 1.97 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो. ऑगस्ट महिन्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण अद्याप सुरू आहे. अनेक भागात शेतात पाणी साचल्याने तेथे जाण्यासाठी रस्ताच नाही, अशी स्थिती आहे. कुही, मौदा आणि हिंगणा तहसीलमध्ये नुकसानीचा प्राथमिक अहवाल अद्याप मिळालेला नाही. भाजीपाला, मका, फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. नाल्यांच्या काठाने सखल भागात असलेल्या शेतातील पिकांसह नदी मातीपर्यंत वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. ऑगस्टमध्ये 1,128 हेक्टरवरील भाजीपाला, 625 हेक्टरवरील मका, 35 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात भाजीपाला, मका आणि फळबागांचेही मोठे नुकसान झाले. काटोल आणि नरखेडमध्ये सुमारे 23 हजार हेक्टरवर संत्रा आणि मोसंबी पिके घेतली जातात. जिथे पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती आहे.
सिंचन घोटाळ्यात कथित क्लीनचिट ऐवजी दोषींना शिक्षाच मिळेल; प्रमुख याचिकाकर्त्या संघटनेचा दावा
ऑगस्ट मध्ये नुकसान
पीक | हेक्टर |
कापूस | 39,856 |
सोयाबीन | 11,571 |
तूर | 6,512 |
भाजीपाला | 1,128 |
भात | 1,010 |
मका | 625 |
फळबाग | 35 |