एक्स्प्लोर

PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ

PM Narendra Modi in Nashik : महायुतीचं घोषणापत्र एका बाजूला आणि दुसरीकडे मविआचे घोटाळा पत्र आहे.  काँग्रेस आणि घटकपक्ष असेल तर घोटाळेच होणार आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय.

नाशिक : काँग्रेस आणि घटकपक्ष असेल तर घोटाळेच होणार आहे. राज्यात तुम्ही यांना पापं करु देणार का? संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलं आहे, ती ऑल इंडिया नाही, ती परजीवी आहे. पायघड्यांवरच ती जिवंत आहे.  बिहार, झारखंड अशा राज्यात दुसऱ्यासोबतच निवडणुका लढत आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर केला. नाशिक येथे आयोजित महायुती उमेदवारांच्या प्रचार सभेतून ते बोलत होते.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकला माझा नमस्कार.  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पहिल्या दिवशी मला नाशकात येण्याचे सौभाग्य मिळाले.  अयोध्येत प्राणप्रतिष्ठा आधी 11 दिवसांच्या अनुष्ठानाची माझी सुरुवात नाशिकमधून झाली होती.  काळाराम मंदिरात मला सेवेचा लाभ मिळाला. विकसित महाराष्ट्र, भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय.  मी पाहतोय नाशकात जनसमूह, महाराष्ट्र बोलतोय भाजप महायुती आहे तर गती आहे, राज्याची प्रगती आहे. 

डबल इंजिनमध्ये डबल विकास 

महाराष्ट्र विकास करतोय. देश नवे रेकोर्ड बनवतोय. देशात गरिबांची चिंता करणारं हे सरकार आहे. गरीब पुढे जातो तेव्हा देश पुढे जातो. काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी गरीबी हटाओचा नारा दिला. मात्र, लोकांच्या पदरी काही पडलं नाही. 10 वर्षात 25 कोटी लोकं गरिबीतून बाहेर आले आहेत. हे शक्य झालं कारण मोदी की नियत सही है. मोदी सेवक बनून काम करतो. हे शक्य झालं कारण गरीबी विरोधातली लढाई सर्वांनी लढली. 50 लाखाहून अधिक महिलांना उज्ज्वला योजनांचे गॅस कनेक्शन आहेत.  नल-जल सुविधा मिळाली आहे.  7 कोटी लोकांना अन्नधान्य मिळतंय. गरिबांसाठी चांगले काम होत आहे, ही कामे पुढे सुरु ठेवण्यासाठी महायुती सरकार बनवणं गरजेचं आहे.  डबल इंजिनमध्ये विकास डबल होतो. पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळतोय. वर्षाला 12 हजार रुपयांची मदत मिळत आहे. महाराष्ट्रात पुन्हा सरकार स्थापन होणार तेव्हा ही मदत 15 हजार रुपयांची केली जाणार आहे. 

नाशिक सशक्त भारतात महत्त्वाची भूमिका बजावतोय

सोयाबीन कापूस आणि दूध उत्पादकांना देखील मदत केली गेली आहे. देशाचा रुपया विदेशात गेला तो आता शेतकऱ्यांना मिळतोय त्यांना जातोय.  कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना समजतो, धोरण आपण बदलली आहेत.  महाराष्ट्र वेगानं पुढे जाणं गरजेचं आहे.  महाराष्ट्र पुढे जाईल तेव्हा देश पुढे जाईल. मागील अडीच वर्षात ते महायुतीने दाखवलं आहे. अनेक प्रकल्प बनवण्यात महाराष्ट्र पुढे आहे. तंत्रज्ञानात निधी येतोय.  मात्र सरकार आले नाही तर प्रगती होईल का? महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराचे अवसर मिळणार का? आपण खूप मागे जाऊ. मेट्रो थांबवली, समृद्धी महामार्ग थांबवण्याची कामं केली, अटल सेतूमध्ये अडथळा आणला. प्रकल्प थांबवण्यात मविआ आघाडीवर आहे. आघाडी वाल्यांना सरकारपासून दूर ठेवा.  महायुती सरकारनं विकासाच्या अजेंड्यावर नाशिकला देखील मोठं महत्त्व मिळालं आहे. हायवे बनत आहे, वाहतूक व्यवस्था होत आहे. 2026 च्या कुंभमेळ्यात देखील याचा फायदा होईल. नाशिकमधील आयटी पार्क रोजगार तयार करेल. नाशिक डिफेन्स क्षेत्रात मोठं केंद्र देखील बनतोय.  नाशकात सुरक्षेची उपकरणं बनवली जात आहेत.  नाशिक सशक्त भारतात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.  काँग्रेस आणि आघाडीवाले लोकं आहेत, ते देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत.  डिफेन्समध्ये कमकुवत करण्यासाठी एचएएलसंदर्भात खोटा प्रचार केला. धरणे आंदोलन केले, कर्मचाऱ्यांना भडकवले.  मात्र एचएएल रेकॉर्ड ब्रेक कामं करत आहे.  नाशिक त्याचे परिणाम बघत आहे.

हीच आंबेडकरांना खरी श्रद्धांजली

काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना कोणाचीच पर्वा नाही.  रिकाम्या पानांची संविधानाची प्रत घेऊन फिरतात. संविधानाची गोष्ट येते तेव्हा उलट्याच गोष्टी करतात.  75 वर्षात आंबेडकर यांचे संविधान जम्मू काश्मीरात लागू होऊ दिले नाही. काँग्रेस हे पाप होते. कलम 370 ची भिंत उभी केली होती.  भाजपा एनडीएनं हे हटवलं आणि एक देश एक संविधान लागू केलं.  माझी हीच आंबेडकरांना खरी श्रद्धांजली आहे. भारताचे संविधान जम्मू काश्मिरीत लागू झाले तेव्हा सर्व देश आनंदी झाला होता. तुम्हाला आनंद झाला. मात्र काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्यांच्या पोटात दुखायला लागले.  दोन-तीन दिवस आधी काँग्रेस आणि साथीदारांनी 370 लागू करण्यासाठी गोंधळ घातला.  जम्मू काश्मीरमध्ये आंबेडकरांचे संविधान हटवले जावे हे यांना पाहिजे. दलित, वाल्मिकी समाजाचे आरक्षण काढावं असं त्यांना वाटतंय. 

संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय 

आघाडीतील इतर घटक पक्ष देखील याला जबाबदार आहेत. जनतेसमोर आपली कामं दाखवत निवडणुकीत जात असतो मात्र काँग्रेसकडे आता एकच पर्याय आहे. काँग्रेसची खोटं बोलण्याची दुकान आहे. काँग्रेस आणि चेल्यांनी हे दुकान महाराष्ट्रात लावलंय. कर्नाटक, हिमाचलमध्ये हेच केलं आणि तिथे काय झालं? निवडणुका संपल्या आणि दुकान बंद झालं तेव्हा केलेल्या गोष्टी पूर्ण नाही झाल्या. सरकार चालवण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. जनतेवर कर लादला जातोय. जनता यांची खरी खोटी जाणते. महायुतीचं घोषणापत्र एका बाजूला आणि दुसरीकडे मविआचे घोटाळा पत्र आहे.  काँग्रेस आणि घटकपक्ष असेल तर घोटाळेच होणार आहे. राज्यात तुम्ही यांना पापं करु देणार का? संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलं आहे, ती ऑल इंडिया नाही आहे ती परजीवी आहे. पायघड्यांवरच ती जीवंत आहे.  बिहार, झारखंड अशा राज्यात दुसऱ्यासोबतच निवडणुका लढत आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी काँग्रेसने आपला हत्यार चालवलं आहे. एससी, एसटी ओबीसींची एकता तोडा आणि राज्य मिळवा, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

आणखी वाचा 

Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
Embed widget