एक्स्प्लोर

Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला

Ramdas Athawale : रामदास आठवले यांनी नाशिकच्या सभेतून तुफान फटकेबाजी केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना रामदास आठवलेंनी टोला लगावला.  

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) प्रचाराचा धुराळा उडालाय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली. या सभेतून केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी तुफान फटकेबाजी केली. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांना रामदास आठवलेंनी टोला लगावला.  

रामदास आठवले म्हणाले की, वाढवायची आहे आपल्याला महाराष्ट्राची शान... साऱ्या देशाचे आहे नरेंद्र मोदींकडे ध्यान... महाराष्ट्र सुटलाय महायुतीचा वारा... नरेंद्र मोदींसाठी जमलाय जनसमुदाय सारा... देऊया भारत मातेचा नारा आणि वाजवूया मविआचे बारा, अशी भन्नाट कविता करत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. 

आपली आर्थिक स्थिती चांगली 

ते पुढे म्हणाले की, विकास, विकास, विकास असा त्यांच्या जीवनाचा टप्पा आहे. मोदी आल्यानंतर गडकरींना रस्ते विभाग दिला आणि अनेक ठिकाणी रस्ते झाले. स्टेशनची रेल्वेची कनेक्टिविटी चांगली झाली आहे.  शेतकऱ्यांना मदत होत आहे.  लोकांना धान्य देण्यात येत आहे.  25 कोटी लोकं 10 वर्षात गरिबीवर आले आहेत.  आपण पुढील 5 वर्षात 3 वर येणार आणि त्यापुढील 5 वर्ष आम्हाला मिळाले तर 2 आणि त्यानंतर एकवर येणार, आपली आर्थिक स्थिती चांगली आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.  

उद्धव ठाकरे, शरद पवारांना टोला

मविआवाले म्हणतात की, प्रगती नाही.  उद्धवजी आपण काय केलं?  मविआ हाय हाय, उद्धवजी आपण केलं काय? घरात बसा, काही हरकत नाही.  बाळासाहेब मला म्हणाले होते की, शिवशक्ती-भीमशक्तीसोबत आली पाहिजे.  मी ज्याचासोबत जातो त्यांचा विजय होतो, ज्यांच्या विरोधात जातो त्यांचा सत्यनाश होतो. उद्धवजी म्हणाले मी तिकडे जातो, मी म्हणालो जा, पण धनुष्यबाण इकडे येणार आहे. पवार साहेबांना म्हणालो, मी इकडे आलो तर तुम्ही तिकडे काय करता आहात. सोनिया गांधींनी पवारांना पंतप्रधान बनवलं नाही, पवारांवर अन्याय केला. आपण लोकसभेत विरोधी पक्षनेते असताना आम्ही आपल्यासोबत होतो.  तेव्हा सोनिया गांधींना बोललो की त्यांना संधी द्या. पण, तसं काही झालं नाही.  आम्ही आपल्याला सांगत होतो इकडे या, असे म्हणत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टोला लगावला. 

आणखी वाचा 

Narendra Modi: आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा, नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget