Latur : अर्ज छाननीतच बाद करणे हे विरोधकंचे निवडणूक जिंकण्याचं तंत्र, अर्चना पाटलांचा आरोप; अमित देशमुख म्हणाले...
Latur Vidhan Sabha Election : सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जात आमच्या अर्जामध्ये, प्रतिज्ञापत्रामध्ये काहीतरी छेडछाड केल्याचा संशय काँग्रेस नेते अमित देशमुखांनी व्यक्त केला.
लातूर : समोर उमेदवार येऊ न देणे हेच मोठं तंत्र विरोधकांना अवगत आहे. आजपर्यंत अनेकांचे अर्ज बाद करून निवडणूक जिंकण्याचे तंत्र त्यांनी हस्तगत केला आहे असा आरोप भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी अमित देशमुख यांच्यावर केला होता. त्याला आत अमित देशमुखांनी उत्तर दिलं आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सत्ताधाऱ्यांच्या काही नेत्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन आमच अर्ज आणि प्रतिज्ञापत्रकासोबत छेडछाड केल्याचा आरोप अमित देशमुखांनी केला.
काय म्हणाल्या अर्चना पाटील?
भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर यांनी अमित देशमुख यांचे नाव ने घेत त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "निवडणुकीत उमेदवाराला समोर येऊन देणे हे त्यांचे तंत्र आहे. आजपर्यंत वेगवेगळ्या निवडणुकीत चारशे ते पाचशे लोकांचे उमेदवारी अर्ज त्यांनी अवैध ठरवले आहेत. हे सर्व हातखंडे लातूरकरांच्या लक्षात आहे. माझा उमेदवारी अर्ज वैध ठरेपर्यंत मी लक्ष ठेवून होते. कारण हे उमेदवार समोर येऊ देत नाहीत. निवडणूक जिंकण्याचे हेच तंत्र सर्वांना कळलं आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही पक्षातील लोकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जात अर्जामध्ये छेडछाड केल्याचा आम्हाला दाट संशय आहे. याबाबतची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे असा खळबळ गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला. कोणत्या पक्षाची लोक होती, त्यांनी काय केलं याबाबत मात्र त्यांनी काहीही स्पष्टता केलं नाही.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. काँग्रेसचे उमेदवार आमदार अमित देशमुख यांच्या विरोधात भाजप उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके अशी लढत होणार आहे.
लातूर येथे आज काँग्रेसच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत आमदार अमित देशमुख यांनी प्रशासनाच्या कारभारावर आणि विरोधी पक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.
काय म्हणाले आमदार अमित देशमुख?
निवडणूक प्रक्रियेत काही आक्षेपार्ह घटनाक्रम घडले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यानंतर, छाननीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही पक्षाचे प्रतिनिधींनी निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज असेल किंवा इतर कागदपत्रे असतील त्यात छेडछाड झाल्याचा संशय आहे. त्याबाबतची तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकडे नोंदवली आहे. त्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी आणि फ्री अँड फेअर इलेक्शनसाठी काम करावे. त्यात कुठेही काही अनुचित झालं नाही हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांकडूनच या प्रक्रियेमध्ये छेडछाड होत असेल तर ही बाब गंभीर आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार दाखल केली आहे अशी माहिती अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपेच्या फैरी झडत आहेत. लातूरच्या राजकारणातील दिग्गज एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. अमित देशमुख यांच्या विरोधात डॉ. अर्चना पाटील चाकूरकर असा सामना होणार आहे. शिवराज पाटील चाकूरकर आणि विलासराव देशमुख काँग्रेसमध्ये असताना अनेक वेळेस कुरघोडीचं राजकारण रंगलं होतं. पुढच्या पिढीतही तोच अध्याय सुरू आहे.
ही बातमी वाचा: