एक्स्प्लोर

''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण

बाळासाहेब यांचे विचार विकायला निघाल्यावर आम्ही उठाव करण्याचं धाडस केलं, तानाजीराव माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते.

धाराशिव : भर उन्हात थांबलेल्या सर्वांना वंदन करतो, तानाजीराव (Tanaji Sawant) तुमच्या प्रेमापोटी हे लोक आले आहेत. परंडा येथील किल्लेदार तानाजी सावंत यांची प्रचारसभा, ही विजयाची सभा आहे. तानाजी सावंत यांनी किल्ल्याची राखण हाती घेतली, त्याला खूप दिवस झाले. त्यांचा नाद करायचा नाही, तानाजीराव जादूगार आहेत, जादू करतात जादू, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंडा (Paranda) विधानसभा मतदारसंघातील सभेत मंत्री आणि शिवसेनेच्या बंडातील त्यांचे शिलेदार तानाजी सावंत यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. परंडा येथील जनतेच्या मनात काय आहे, हे गर्दीने ठरवलं आहे. 23 तारखेला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) फटाखे फोडायला येतोय. धनुष्यबाण आमचा आहे, म्हणणाऱ्यांनी मशालही देऊन टाकली, असे म्हणत परंडा मतदारसंघात महाविकास आघाडीने जाहीर केलेली उमेदवारी मागे घेतल्यावरुन एकनाथ शिंदेंनी नाव न घेता शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 

बाळासाहेब यांचे विचार विकायला निघाल्यावर आम्ही उठाव करण्याचं धाडस केलं, तानाजीराव माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते. बाळासाहेबांनी कमावलेल्या धनुष्यबाणाची आण बान शान नियतीने आपल्यावर सोपवली आहे. गिनिज बुकमध्ये नोंद झाली असं काम तुमच्या पठ्ठ्या ने केलंय, असे म्हणत पुन्हा एकदा शिवसेनेच्या बंडात तानाजी सावंत यांची भूमिका महत्त्वाची होती, हे मुख्यमंत्र्‍यांनी सांगितलं. महाविकास आघाडी आणि महायुतीने केलेली काम बघा, होऊन जाऊद्या दूध का दूध पाणी का पाणी. परंडा येथील विकासासाठी दीड हजार कोटी दिले, एकनाथ शिंदे देणारा आहे, घेणारा नाही. सभेसाठी मंडप घातला की निवडणूक खर्चात धरतात, आता वाचलेला हा खर्च डिसेंबरमध्ये महिलांच्या खात्यात टाकायचा आहे. आम्ही खात्यात पैसे टाकले, तेव्हा विरोधक म्हणाले, पैसे काढून घ्या माघारी घेतील. योजेनेबद्दल भिक, लाच, काय-काय बोलले, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना हे कळणार नाही. एकनाथ शिंदे शेतकऱ्याचं पोरगं आहे. मी आईची तगमग बघितली आहे. त्यामुळे, आचारसंहिता लागेल हे आम्हाला माहीत होत, म्हणून ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे आम्ही देऊन टाकले. ज्यांचे पैसे आले नाही, त्यांचेही पैसे राहणार नाहीत हा शब्द  देतो, असे म्हणत पुन्हा एकदा लाडक्या बहि‍णींना मुख्यमंत्र्‍यांनी आश्वासन दिलं आहे. 

उजनीचं पाणी कौडगाव इथं येईल

एकनाथ शिंदे आंदोलन, संघर्ष करून पुढे आला आहे. शेतकऱ्यांसाठी एकदा काय दहा वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. माझ्या लाडक्या बहिणीला लखपती झालेलं मला पहायचं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला, आपल्या राज्यात कोणी उपाशी झोपणार नाही याची, तजवीज केलीय. शेतकऱ्यांना शेतीच बिल आपण माफ केलं आहे, आता सर्वांना एकूण बिलाच्या 30 टक्के सवलत देणार आहे. हा फक्त ट्रेलर आहे, असे म्हणत आणखी योजना लागू करणार असल्याचे मुख्यमंत्र्‍यांनी सूचवले. निर्णय घ्यायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याला वाघाचे कातडे पांघरुन वाघ होत नाही. उजनीच पाणी कौडगाव इथ पडायला पाहिजे, ते होईल. तानाजीराव तुमचं काम बोलतोय. मतदार संघाचा 35 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे, असेही शिंदेंनी म्हटले 

हेही वाचा

वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अकोट नगरपालिकेत सर्वाधिक चर्चेत उमेदवार खोट्या शपथपत्रामुळे अडचणीत, चौथं आपत्य लपवलं; शपथपत्राची सत्यता तपासणार कशी?
अकोट नगरपालिकेत सर्वाधिक चर्चेत उमेदवार खोट्या शपथपत्रामुळे अडचणीत, चौथं आपत्य लपवलं; शपथपत्राची सत्यता तपासणार कशी?
Kagal Nagar Palika Election: कागलला मुश्रीफ घाटगेंच्या युतीनं एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता 'भाई' धावणार! सभेचा मुहूर्तही ठरला
कागलला मुश्रीफ घाटगेंच्या युतीनं एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता 'भाई' धावणार! सभेचा मुहूर्तही ठरला
Satara Nagar Palika Election: साताऱ्यात दोन्ही राजेचं मनोमिलन मात्र कार्यकर्ते काही केल्या तयार होईनात! अपक्ष उमेदवारांचा फटका दोघांनाही बसणार?
साताऱ्यात दोन्ही राजेचं मनोमिलन मात्र कार्यकर्ते काही केल्या तयार होईनात! अपक्ष उमेदवारांचा फटका दोघांनाही बसणार?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते धर्मध्वजारोहण; रामनगरी उत्साहात मग्न, मंदिराचं वैशिष्ट्य काय वाचा सर्व अपडेट्स
अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते धर्मध्वजारोहण; रामनगरी उत्साहात मग्न, मंदिराचं वैशिष्ट्य काय, वाचा सर्व अपडेट्स
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif : वॉर्डात कमी मतदान झालं तर खैर नाही, मतदारांना जेव्हा तंबी मिळते Special Report
Letter to CM Devendra Fadnavis:माओवाद्यांकडून सामूहिक आत्मसमर्पण,झोनल कमिटीचं मुख्यमंंत्र्यांना पत्र
Anant Garje On Court : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला अटक, आज कोर्टात हजर करणार
Pankaja Munde PA Anant Garje Arrested : डॉ गौरी पालवे प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएला अटक
Periods Leave Policy कोणत्या राज्यात मिळते मासिक पाळी रजा? Special Reports

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अकोट नगरपालिकेत सर्वाधिक चर्चेत उमेदवार खोट्या शपथपत्रामुळे अडचणीत, चौथं आपत्य लपवलं; शपथपत्राची सत्यता तपासणार कशी?
अकोट नगरपालिकेत सर्वाधिक चर्चेत उमेदवार खोट्या शपथपत्रामुळे अडचणीत, चौथं आपत्य लपवलं; शपथपत्राची सत्यता तपासणार कशी?
Kagal Nagar Palika Election: कागलला मुश्रीफ घाटगेंच्या युतीनं एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता 'भाई' धावणार! सभेचा मुहूर्तही ठरला
कागलला मुश्रीफ घाटगेंच्या युतीनं एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता 'भाई' धावणार! सभेचा मुहूर्तही ठरला
Satara Nagar Palika Election: साताऱ्यात दोन्ही राजेचं मनोमिलन मात्र कार्यकर्ते काही केल्या तयार होईनात! अपक्ष उमेदवारांचा फटका दोघांनाही बसणार?
साताऱ्यात दोन्ही राजेचं मनोमिलन मात्र कार्यकर्ते काही केल्या तयार होईनात! अपक्ष उमेदवारांचा फटका दोघांनाही बसणार?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते धर्मध्वजारोहण; रामनगरी उत्साहात मग्न, मंदिराचं वैशिष्ट्य काय वाचा सर्व अपडेट्स
अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते धर्मध्वजारोहण; रामनगरी उत्साहात मग्न, मंदिराचं वैशिष्ट्य काय, वाचा सर्व अपडेट्स
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
Ravindra Chavan KDMC Election: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
Smriti Mandhana: पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
Embed widget