एक्स्प्लोर

Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कुडाळ विधानसभा मतदारसंघात निलेश राणे आमदार होतील, याचा विश्वास आहे. उद्धव ठाकरेंचे 25 आमदारही निवडून येणार नाहीत.

सिंधुदुर्ग: उद्धव ठाकरे हे हिंदुत्त्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना गोळ्या घातल्या असत्या, असे वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले. ते शुक्रवारी निलेश राणे यांच्या प्रचारासाठी कुडाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 

कुडाळ तालुक्याची ही भाजपची भव्य बैठक असून निलेश राणे निवडून येणे आवश्यक आहे, हे मी सर्वांना सांगितले आहे. 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. तेव्हा निलेश राणे हे आमदार होतील, यामध्ये शंका नाही. सिंधुदुर्ग जिल्हा राज्याच्या राजकारणात फार झळकतोय. सर्वांचे आपल्याकडे लक्ष असून सर्व विरोधक टीका करत आहेत. ही टीका वैयक्तिक नसून आपल्या विकासावर आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले.

उद्धव ठाकरेंचे 25 आमदारही निवडून येणार नाहीत: नारायण राणे

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांची भाषा सुसंस्कृत नाही, ते शिव्या देतात. ही भाषा बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याला शोभत नाही. उद्धव ठाकरे यांची भाषा संस्कृत नसून बाळासाहेबांच्या घराण्याच्याला अशी भाषा शोभत नाही. शिव्या देतात. महाराष्ट्रात शिवसेनेचा एखादा कार्यकर्ता नावारुपाला येत असेल तर त्याला सोडून लावण्याचा आणि कमजोर करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. नारायण राणे, छगन भुजबळ असे अनेक नेते आहेत. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात काम केले आणि आता म्हणतोय की पुन्हा मला मुख्यमंत्री करा. कोण देईल सत्ता यांना?, असा सवाल नारायण राणे यांनी विचारला.

नारायण राणेंची शरद पवारांवर जोरदार टीका

शरद पवार याचं वय 83, 84 इतकं आहे. तरीदेखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास पाहून त्यांना असहय झालं आणि त्यांनी टीका केली. राणेंच्या दोन्ही मुलांवर संस्कार नाहीत, अशी टीका केली. मात्र, माझ्या घरात त्यांच्यावर संस्कार झाले. मी देखील पवारांची कुंडली काढलेली आहे. गेली अनेक वर्षे आम्ही देखील राजकारणात आहोत. पवार साहेब तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होता. विकासावर आणि मराठा आरक्षणावर बोलू नका, असे नारायण राणे यांनी म्हटले.

मला निवडून द्या, माझ्यावर राग काढू नका: निलेश राणे

मला आमदार सर्वसामान्य जनतेसाठी व्हायचं आहे. ठेकेदारीसाठी मला आमदारकी नको. आम्ही सरकारच्या पैशाला केव्हा हात लावला नाही, त्यामुळे अधिकारी ऐकतात.  वैभव नाईक यांची ठेकेदारीमध्ये भागीदारी असल्याने त्याचं अधिकारी ऐकत नाहीत. मच्छीमारांसाठी वैभव नाईक यांनी गेली 10 वर्ष काही केलं नाही, त्यामुळे ते आम्हाला मतदान करतील. शेतकऱ्यांसाठी सभागृहात जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणे गरजेचे असते. ट्रॅक्टर चालवून फोटो काढून त्यांच्या समस्या सुटत नाहीत, असा टोलाही निलेश राणेंनी वैभव नाईकांना लगावला.

आमदार आला की समोरचा अधिकारी उठला पाहिजे असा आमदार असला पाहिजे. 288 आमदारांपैकी आपला आमदारचा ठसा उमटला पाहिजे, अशी आमदाराची ओळख असणे गरजेचे आहे.  रवींद्र चव्हाण यांनी गेल्या अडीच वर्षात मला भावासारखे संभाळलं, कुडाळ मालवणमध्ये रवींद्र चव्हाण यांनी साडेसहाशे कोटी रुपये दिले. रवींद्र चव्हाण पाठवलेला पैसा सर्वसामान्य पर्यंत पोहोचला, त्यात कुठेही भेसळ झालेली नाही. नारायण राणे यांनी आपला राज्यसभेवरील 90 टक्के निधी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघासाठी वापरला. कार्यकर्त्यांनी जे काय केलं त्यामुळे आज सर्व काही शक्य आहे. 2014 पर्यंत नारायण राणेंचा मतदारसंघ म्हणून कुडाळ मालवण मतदारसंघाची ओळख होती, ती ओळख पुन्हा आणण्यासाठी मला निवडून दिलं पाहिजे. तसेच हा मतदारसंघ टॉप ५ मध्ये न्यायचा आहे. कुडाळ मालवण मतदारसंघातील आमदार म्हणून कुठलही चुकीचं काम करणार नाही. माझ्यावर कुणीही राग काढू नका, असे आवाहन निलेश राणे यांनी केले.

आणखी वाचा

आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा, नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget