ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Vidhan Sabha Election 2024: ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) धामधुमीत अकोल्यात भाजपातील वाद उफाळून आला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) धामधुमीत अकोल्यात भाजपातील वाद उफाळून आला आहे. अकोल्याच्या माजी महापौर अश्विनी हातवळणे यांनी पक्षाचे आमदार आणि प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांच्यावर गुंडशाही आणि एकाधिकारशाहीचा आरोप केलाय. आमदार रणधीर सावरकरांकडून पक्षातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वारंवार अपमानित करीत डावललं जात असल्याचा आरोप हातवळणे यांनी केलाय. आज अश्विनी हातवळणे, त्यांचे पती आणि माजी नगरसेवक प्रतुल हातवळणे आणि ॲड.गिरीश गोखले यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केलीय. त्यामुळे अकोल्यात पक्षांतर्गत वाद अधिक उफाळून येण्याची शक्यता आहे.
अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपने दिलेल्या उमेदवारीवरून पक्षात अंतर्गत खदखद आहे. भाजपने अकोला पश्चिम मतदारसंघातून माजी महापौर विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिलीये. विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील दोन ज्येष्ठ नेत्यांनी अकोला पश्चिम मतदारसंघात बंडखोरी केलीये. माजी नगराध्यक्ष हरीश आलिचंदानी आणि माजी शहराध्यक्ष डॉ.अशोक ओळंबे यांनी बंडखोरी केली आहे. हातवळणे यांनी केलेल्या आरोपानंतर अकोला भाजपात मोठा स्फोट होण्याची शक्यता आहेय.
कोण आहेत अश्विनी हातवळणे?
अश्विनी हातवळणे या अकोला शहराच्या द्वितीय महापौर आहेत.
2004 ते 2007 असे दोन दा त्यांनी महापौर पद भुषवलंय
हातवळणे परिवार संघ परिवाराशी तीन पिढ्यांपासून जुळलेला आहे.
अश्विनी हातवळणे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रसेविका समितीत अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
राजकारणात येण्या आधी हातवळणे यांच्या कारकिर्दीला वृत्त निवेदिका म्हणून सुरुवात केली आहे.
1998 ते 2001 या कालावधीत अकोल्यातील स्थानिक वृत्तवाहिनीत वृत्त निवेदिका म्हणूनही त्यांनी कार्य केलंय.
अकोल्यातील नाट्य क्षेत्रात त्या सक्रिय असून अनेक नाटकांमध्येही त्यांनी काम केलं आहे.
भाजपच्या महिला आघाडीत अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या असून भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पडली आहे.
अकोल्यात वंचितला मोठा धक्का
अकोल्यात वंचितला मोठा धक्का बसलाय. पक्षाचे जेष्ठ ओबीसी नेते आणि प्रकाश आंबेडकरांचे विश्वासू प्रा. डॉ. संतोष हुशेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. बाळापुर मतदारसंघातील वाडेगाव येथे उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. डॉ. संतोष हुशेंना वंचितने अकोला पूर्व मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने नाराज होतेय. त्यातून त्यांनी वंचितचा राजीनामा दिला होताय. डॉ़. हुशे अकोला जिल्ह्यातील माळी समाजाचे मोठे नेते आहेयेत. त्यांच्या प्रवेशाने ठाकरे गटाला अकोला पुर्व आणि बाळापुर मतदारंसघात मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा