एक्स्प्लोर
पालघरमध्ये लग्नमंडपात नवरदेवाला बलात्कार प्रकरणी बेड्या

पालघर : लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी आतुर झालेल्या नवरदेवावर चक्क पोलिसांच्या बेड्यांमध्ये अडकण्याची वेळ आली आहे. पालघरमध्ये लग्नाच्या दिवशीच नवरदेवाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
पालघरमध्ये राहणारा 22 वर्षांचा तरुण 24 वर्षांच्या तरुणीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. विशेष म्हणजे पीडित तरुणी ही त्याची जवळची नातेवाईक आहे. लग्नाचं वचन देऊन तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
आपण एकमेकांना बालपणापासून ओळखतो, तसंच रक्ताच्या नात्यातील भावंडांचीही आपल्या कुटुंबात लग्न होत असल्यामुळे आपण तरुणाच्या वचनांना बळी पडलो आणि शारीरिक संबंध ठेवले, अशी कबुली पीडितेने दिली आहे.
गेल्या सहा वर्षांपासून म्हणजे 2010 पासून मे 2016 पर्यंत दोघं रिलेशनशीपमध्ये होते. मात्र गुरुवारी आरोपीचं लग्न असल्याचं समजल्याने आदल्या दिवशी पीडितेने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर बोईसर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. अखेर पोलिसांनी भर लग्न मंडपातूनच तरुणाला अटक केली.
बलात्कार प्रकरणी कलम 376 अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी आरोपीला कोर्टात हजर करण्यात येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
