एक्स्प्लोर
Advertisement
GramPanchayat Election Results 2021 : सिंधुदुर्गात राणेंचं वर्चस्व, भाजपाकडे 45 तर शिवसेनेचं 21 ग्रामपंचायतींवर वर्चस्व
मालवणमध्ये आमदार वैभव नाईक यांना तर सावंतवाडीमध्ये माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे.
सिंधुदुर्ग : ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपाकडे 45 ग्रामपंचायती तर शिवसेनेकडे 21 ग्रामपंचायती आल्या आहेत. राष्ट्रवादीने 1 आणि गाव पॅनेलने 3 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.
सिंधुदुर्गात नारायण राणेंनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. मालवणमध्ये आमदार वैभव नाईक यांना तर सावंतवाडीमध्ये माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे. देवगड विधानसभा मतदारसंघात आमदार नितेश राणे यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. देवगड तालुक्यात भाजपाने 17 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. तर शिवसेना 4, राष्ट्रवादी 1 आणि गाव पॅनलकडे 1 ग्रामपंचायत आली आहे.
वैभववाडी तालुक्यात 9 भाजप आणि 4 ग्रामपंचायती शिवसेनेकडे आल्या आहेत. तर कणकवलीत 2 शिवसेना आणि 1 भाजपाकडे आली आहे. मालवण विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार वैभव नाईक यांना धक्का बसला आहे. मालवण तालुक्यात 5 ग्रामपंचायतींवर भाजपाने सत्ता मिळविली आहे. तर 1 ग्रामपंचायत शिवसेनेकडे आली आहे.
कुडाळ तालुक्यात 4 ग्रामपंचायतींवर भाजपा, 4 सेना आणि 1 गाव पॅनलकडे आली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे. सावंतवाडी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या कोलगाव ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले.
भाजपा आमदार आशिष शेलार यांची सासुरवाडी असलेल्या दांडेली ग्रामपंचायतीवर भाजपाचे कमळ फुलले आहे. तालुक्यात 8 ग्रामपंचायती भाजपाकडे तर 3 ग्रामपंचायती सेनेकडे आल्या आहेत. दोडामार्ग तालुक्यात 2 ग्रामपंचायती सेनेकडे तर 1 ग्रामपंचायत ग्रामविकास पॅनल कडे आली आहे. वेंगुर्ले तालुक्यात 1 सेनेकडे आणि 1 भाजपाकडे आली आहे.
संबंधित बातम्या
- Gram Panchayat Election Results 2021 | हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवारांचं वर्चस्व, सातही जागांवर विजय
- Gram Panchayat Election Results | अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटीलच 'दादा', माळशिरसमध्येही 44 पैकी 35 ग्रामपंचायतींवर वर्चस्व
- Maharashtra Gram Panchayat Election Results | चंद्रकांत पाटलांना गावही राखता आलं नाही, शिवसेनेचा सहा जागांवर विजय
- औरंगाबादमधील पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात; 25 वर्षांनंतर गावात सत्तांतर
- परळीत धनंजय मुंडेंचा वरचष्मा, 12 पैकी 10 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा!
- औरंगाबादमधील पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात; 25 वर्षांनंतर गावात सत्तांतर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement