एक्स्प्लोर

Gram Panchayat Election Results | अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटीलच 'दादा', माळशिरसमध्येही 44 पैकी 35 ग्रामपंचायतींवर वर्चस्व

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील गटाची सरशी झाली आहे. माळशिरसमध्ये 44 पैकी 35 ग्रामपंचायतींवर विजयसिंह मोहिते पाटलांनी वर्चस्व राखलं आहे.

सोलापूर: राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमधील लक्षवेधक लढतींपैकी एक लढत म्हणजे अकलूज ग्रामपंचायत निवडणूक. यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील गटाची सरशी झाली असून त्यांनी 17 पैकी 14 जागा जिंकल्या आहेत. असे असले तरी भाजप पॅनलचे प्रमुख उमेदवार व विजयसिंह मोहिते यांचे पुतणे संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपची 'गड आला पण सिंह गेला' अशी अवस्था झाली आहे.

माळशिरसमध्ये तालुक्यात विजयसिंह मोहिते पाटील गटाची सरशी झाली असून त्यांनी 44 पैकी 35 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवलं आहे. तर उर्वरित नऊ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीला आपलं वर्चस्व राखण्यात यश आलंय. माळशिरस तालुक्यातील भाम्ब येथे राष्ट्रवादी उमेदवार चिट्ठीवर तर बीजवडी मध्ये भाजप उमेदवार चिट्ठीवर विजयी झाले आहेत. या दोन्ही ठिकाणी समसमान मते मिळाल्याने चिट्ठी टाकण्यात आली होती.

Maharashtra Gram Panchayat Election Results | चंद्रकांत पाटलांना गावही राखता आलं नाही, शिवसेनेचा सहा जागांवर विजय

आशिया खंडातली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या अकलूजमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील गट विरुध्द धवलसिंह मोहिते पाटील गट असा सामना होता. तब्बल 45 हजाराहून जास्त लोकसंख्या असलेल्या अकलूजला नगरपालिकेत रुपांतर करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात होता. पण नंतर मतभेद झाल्याने दोन्ही गटांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकमेकांविरोधात शड्डू ठोकला होता. या निवडणुकीच्या माध्यमातून मोहिते विरुध्द मोहिते असा संघर्ष शिगेला पोहचल्याचं पहायला मिळालं.

अकलूज ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षापासून विजयसिंह मोहिते पाटील गटाची एक हाती सत्ता आहे. त्याला विजयसिंहांचे पुतणे धवलसिंह यांनी आव्हान दिलं होतं. इथल्या 17 जागांपैकी एका जागेवर धवलसिंह यांच्या पत्नी उर्वशीराजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 16 जागांसाठी चुरसीने मतदान झालं होतं. धवलसिंह मोहिते पाटलांना मोठ्या प्रमाणावर रसद पुरवण्यात आली होती. बारामतीकरांचे या निवडणुकीवर लक्ष असल्याचं सांगण्यात यतं होते.

औरंगाबादमधील पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात; 25 वर्षांनंतर गावात सत्तांतर

मोहिते विरुद्ध मोहिते हा दुसऱ्या पिढीतील संघर्ष अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा समोर आला आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहितेपाटील विरुद्ध माजी मंत्री कै प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष आता पुढची पिढी धैर्यशील मोहिते विरुद्ध डॉ धवलसिंह मोहिते यांच्यात सुरु आहे. दोन्ही मोहिते घराण्यातील संघर्षामुळे अकलूजमध्ये केवळ 58 टक्के मतदान झालं होतं.

विधानसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धवलसिंह मोहित पाटलांना आपल्या बाजूने बळावल्याने माळशिरस विधानसभेला भाजपाला अगदी निसटता विजय मिळवता आला होता.

Gram Panchayat Election Results 2021 | हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवारांचं वर्चस्व, सातही जागांवर विजय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget