एक्स्प्लोर
Advertisement
पदवीधर मतदारसंघात भाजपला धक्का, एकही नवी जागा जिंकता आली नाही!
मुंबई: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी 3 फेब्रुवारीला मतदान घेण्यात आलं होतं. याचा निकाल आता हाती आला आहे. या निवडणुकीत सगळ्याच पक्षांनी आपआपल्या जागा राखल्या आहेत.
नाशिकमध्ये काँग्रेसचा झेंडा, भाजपला पराभवाचा धक्का
नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. सुधीर तांबे यांचा दणदणीत विजय झाला आहे. सुधीर तांबे 69 हजार 562 मतं मिळाली. त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांचा तब्बल 42 हजार 825 मतांनी पराभव केला.
पारंपरिक मतदारसंघात सरंक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या जावयाचा हा पराभव भाजपसाठी धक्का मानला जातो आहे. नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाचही जिल्ह्यातल्या जवळपास 1 लाख 43 हजार पदवीधारकांनी या निवडणुकीत मतदान केलं होतं. यापैकी डॉ. तांबे यांना 83 हजार 311 मतं मिळाली. तर भाजपच्या डॉ. प्रशांत पाटील यांना 40 हजार 486 मतं मिळाली. तर तब्बल 14 हजार 810 मतं अवैध ठरली.
अमरावतीत पदवीधर मतदारसंघातून गृहराज्यमंत्री रणजीत पाटलांचा विजय
अमरावती पदवीधर मतदारसंघातून गृहराज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार रणजीत पाटील विजयी झाले आहेत. त्यांना पहिल्या पसंतीची 66 हजार मतं मिळाली आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांचा पराभव केला. त्यामुळं भाजपनं अमरावतीत आपला दबदबा कायम ठेवला आहे.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विक्रम काळे
औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे 11 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या सतीश पत्कींचा पराभव केला. विक्रम काळेंना 25 हजार 288मतं मिळाली. तर पत्कींना 13 हजार 735 मतं मिळाली.
कोकण शिक्षण मतदारसंघातून राष्ट्रवादी पुरस्कृत बाळाराम पाटील विजयी
कोकण शिक्षक मतदार संघात शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीचे संयुक्त उमेदवार बाळाराम पाटील यांचा विजय झाला आहे. याठिकाणी शिवसेना पुरस्कृत उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पराभव झाला आहे.
http://poll.fm/5r0lb
संबंधित बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement