एक्स्प्लोर
तुमची संघर्षयात्रा, तर आमची संवादयात्रा : मुख्यमंत्री
पिंपरी : शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत, ते संघर्षयात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्ष होत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.
विरोधकांची संघर्षयात्रा असेल, तर आम्हीही संवादयात्रा काढू, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
पिंपरीत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचा समारोप झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
केवळ नाव दिल्याने संघर्षयात्रा होत नाही, संघर्षयात्री ती होती, जी गोपीनाथ मुंडेंनी काढली. ज्यांच्या संघर्षयात्रेने सत्ताधाऱ्यांना शह देऊन परिवर्तन घडवलं होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांना माहिती आहे, आमचं जे नुकसान झालंय ते फक्त यांच्यामुळेच झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचाही या संघर्षयात्रेला फारसा प्रतिसाद नाही. असं विरोधकांपैकीच काही जण मला येऊन सांगतात, असा घणाघातही मुख्यमंत्र्यांनी केला.
''तुमची संघर्षयात्रा, आमची संवादयात्रा''
भाजपकडून संवादयात्रा काढली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. आम्ही राज्यातल्या 25 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचू, त्यांच्या समस्या जाणून घेऊ आणि त्यांना सरकारी योजनांची माहिती देऊ, शिवाय यासाठी आम्ही एसी बसमध्ये जाणार नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
आमचे आमदार, खासदार आणि सर्व पदाधिकारी शेतकऱ्यांशी शिवारावर जाऊन संवाद साधतील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
''लोकांनी टाकलेला विश्वास कायम ठेवा''
लोकांचा विश्वास मिळवणं हे सोपं आहे, मात्र तो टिकवणं अवघड आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आतापर्यंत सत्तापरिवर्तनासाठी काम केलं. मात्र आता लोकांनी आपल्यावर विश्वास टाकलाय. त्यामुळे आता सत्ता परिवर्तनासाठी नव्हे, तर समाज परिवर्तनासाठी काम करा, तरंच हा विश्वास कायम राहिल, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.
कुठल्याही पदाचा अहंकार आला तर लोक आपल्याला आपली जागा लगेच दाखवतात. पिंपरीत पवारांचा बुरुज कोसळला, सोलापुरात मोहिते पाटलांचा बुरुज कोसळला, तसंच सांगली, कराड, इस्लामपूरसह राज्यभरात हीच परिस्थिती आहे. हे लोकांपासून दूर गेले आहेत. त्याचा हा परिणाम आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
''22 एप्रिलपर्यंत केंद्रावर आलेली सर्व तूर घेऊ''
देशात 11 लाख टन खरेदी झाली. एकट्या महाराष्ट्रात 4 लाख टन तुरीची खरेदी झाली आहे. 22 एप्रिलपर्यंत जेवढी तूर केंद्रावर आलीय, ती सगळी तूर घेऊ, पण शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्याची तूर अजिबात घेणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे
- 22 एप्रिलपर्यंत जेवढी तूर केंद्रावर आलीय, ती सगळी तूर घेऊ, पण शेतकऱ्याच्या नावावर व्यापाऱ्याची तूर अजिबात घेणार नाही - मुख्यमंत्री
- देशात 11 लाख टन खरेदी, एकट्या महाराष्ट्रात 4 लाख टन खरेदी -
- तुमची संघर्षयात्रा तर आमची संवादयात्रा, आमदार, खासदार शिवारावर संवाद साधतील, एसी बसने प्रवास नसेल
- शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला जबाबदार असलेले नेतेच आज संघर्षयात्रा काढत आहेत : मुख्यमंत्री
- केवळ नाव दिल्याने संघर्षयात्रा होत नाही, गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षयात्रेने परिवर्तन घडवलं होतं : मुख्यमंत्री
- लोकांचा विश्वास कायम ठेवायचा असेल, तर कार्यपद्धतीत बदल करा
- भाजपच्या सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्षांनी पारदर्शकतेबाबत तडजोड करु नये : मुख्यमंत्री
- विजयाने उन्मत्त, अहंकारी न होता प्रामाणिकपणे काम करुन समाज परिवर्तन घडवायचंय : मुख्यमंत्री
- आता सत्ता परिवर्तनासाठी नाही, समाज परिवर्तनासाठी काम करण्याची जबाबदारी : मुख्यमंत्री
- पिंपरीत पवारांचा बुरुजही ढासळला, कमळ फुललं : मुख्यमंत्री
- छोट्या पदाच्या अहंकाराने आपण लोकांपासून दूर जातो
- जनता ही राम आहे, आपल्याला रामराज्य निर्माण करायचंय
- भाजपला मिळालेलं यश हा लोकांनी दाखवलेला विश्वास आहे, तो कायम ठेवा
- भाजप हा महाराष्ट्रव्यापी पक्ष, कोणत्याही एका विभागाचा नाही
- 2017 मध्ये मिळालेला विजय जनतेने दिलेली कामाची पावती आहे : मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
Advertisement