गोंदिया करांची स्वप्नपूर्ती; 79 वर्षानंतर उडाले पहिल्यांदा प्रवासी विमान
गोंदियाच्या बिर्शी विमानतळावरून तब्ब्ल 79 वर्षानंतर आज प्रवाशी वाहतूक विमान सेवेला सुरवात करण्यात आली आहे. याचे उद्घाटन केंद्रीय उद्यान मंत्री जोतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते इंदूर येथून करण्यात आले.
गोंदियाच्या बिर्शी विमानतळावरून तब्ब्ल 79 वर्षानंतर आज प्रवाशी वाहतूक विमान सेवेला सुरवात करण्यात आली आहे. याचे उद्घाटन केंद्रीय उद्यान मंत्री जोतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते इंदूर येथून करण्यात आले. तर गोंदिया ते हैदराबाद या विमान सेवेला गोंदिया विमानतळावरून खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी या 72 सीटर विमानात 65 लोकांनी प्रवास केला आहे. माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते 2008 मध्ये या अत्याधुनिक विमानतळाची निर्मिती करण्यात आली होती. उशिरा झाला असला तरी आज गोंदियाकरांना प्रथमच या विमानतळाचा लाभ घेता आला.
गोंदिया शहराला लागून असेलल्या बिर्शी गावात ब्रिटिश सरकारने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1942-43 आली बिर्शी विमानतळाची उभारणी करण्यात आली होती. मात्र स्वातंत्र्या आधी हा विमानतळ पूर्णतः नासधूस झाल्याने 2005 मध्ये तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी या विमानतळाचे आधुनिकीकरण करीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ सुरू केले. तब्बल 79 वर्षांच्या कालावधीनंतर केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत प्रवासी विमान वाहतूक सेवेस आज प्रारंभ झाला आहे.
फ्लायबिग कंपनीचा प्रवासी विमान इंदूर विमानतळावरून सकाळी 9.30 सुटेल आणि गोंदिया विमानतळावर सकाळी 10.45 वाजता पोहोचेल. तर हैदराबादसाठी 1 वाजता उड्डाण भरले. त्यानंतर सोमवारपासून वेळापत्रकानुसार नियमित विमानसेवेचा लाभ महाराष्ट्रासह लगतच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील प्रवाशांना सुद्धा होणार आहे. शेतीविषयक मालाची वाहतूक करण्यास या सेवेची भविष्यात मदत होणार.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Tejas More : 'ते' व्हिडीओ बनवत सरकारी वकील प्रवीण चव्हाणांना अडचणीत आणणारा तेजस मोरे कोण?
- Maharashtra Budget Session: फडणवीसांनी वाचलेल्या भाषणातील शब्द अन् शब्द जशाच्या तसा; वाचा संपूर्ण भाषण
-
Beed News : राजकीय वैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी; 11जण जखमी
-
PayTm : पेटीएम संस्थापक विजय शेखर शर्मा यांची अटकेनंतर जामीनावर सुटका
- Solapur: सोलापूरात पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाची डान्सबारवर रेड; 49 आरोपी लाखोंच्या मुद्देमालासह ताब्यात
-
Latur Crime News : धक्कादायक! पोलीस ठाण्यातच पोलिसाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या