(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tejas More : 'ते' व्हिडीओ बनवत सरकारी वकील प्रवीण चव्हाणांना अडचणीत आणणारा तेजस मोरे कोण?
देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) आरोपांचं खंडण करताना प्रवीण चव्हाण यांनी व्हिडीओ जळगावातील तेजस मोरे या तरुणानं बनवले असल्याचं म्हटलं आहे. कोण आहे तेजस मोरे...
Maharashtra News : विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारवर पेनड्राइव्ह बॉम्ब फोडल्यानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. दरम्यान यावर प्रवीण चव्हाण यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. आरोपांचं खंडण करताना प्रवीण चव्हाण यांनी हे व्हिडीओ जळगावातील तेजस मोरे या तरुणानं बनवले असल्याचं म्हटलं आहे. मूळचा जळगावचा असलेला तेजस मोरे नावाचा तरुण अशील म्हणून आपल्याकडे आला आणि त्याने हे स्टिंग ऑपरेशन केल्याचं चव्हाणांनी म्हटलं होतं. यातून या स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड होतं आहे, असंही प्रवीण चव्हाण म्हणाले होते. प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं होतं की, माझ्या ऑफिसात अशील म्हणून येणाऱ्या तेजस मोरेने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यासाठी त्याने समोरच्या काचेच्या भिंतीवर लावायला घड्याळ भेट दिले आणि त्यात छुपा कॅमेरा बसवला.
कोण आहे तेजस मोरे (Know About Tejas More)
तेजस मोरे हा जळगाव शहरातील जिल्हा परिषद कॉलनी भागात राहणारा.
तेजस मोरे हा गेल्या दहा बारा वर्षांच्या पासून पुण्यात राहत असल्याची शेजाऱ्यांची माहिती आहे.
तेजस मोरे हा लहानपणापासून चांगला हुशार आणि सुसंस्कारित मुलगा असल्याचं शेजाऱ्यांचं म्हणणं.
जळगाव शहरातील रावसाहेब रुपचंद विद्यालयात महाविद्यालय येथे दहावीपर्यंत शिक्षण
नंतर तो पुण्यात इंजिनियरींग शिक्षण घेण्यासाठी गेला.
त्याची आई शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात तर अध्यापिका तर वडील जिल्हा परिषदेत इंजिनियर होते. दोघेही आता सेवा निवृत्त झाले आहेत
तेजस मोरे हा पुण्यात बिल्डर शिपिंगचे काम करीत असताना त्याने पुण्यात एस बी आय बँकेची फसवणूक केली आणि त्या प्रकरणात तेजसला सहा महिन्यांचा कारावासही झाला असल्याची शेजाऱ्यांची माहिती
तेजस हा गेल्या दहा वर्षांच्या पासून पुण्यात राहत असला तरी सणावाराच्या निमित्ताने तो दोन तीन दिवसांसाठी जळगावात येत असल्याचंही शेजारी सांगत आहेत
हे प्रकरण उघड झाल्यापासून त्याचे वडील रवींद्र मोरे हे आपल्या घराला कुलूप लावून गावी गेले आहेत, तर त्यांचा मोबाईलही स्विच ऑफ येत आहे.
तेजस मोरे यांच्या विरोधात 2019 मधे खंडणीचा गुन्हा जळगाव शहर पोलिस ठाण्यात. फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, हे प्रकरण न्याय प्रविष्ट
संबंधित बातम्या :