एक्स्प्लोर

Akola News : अखेर विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल; ठाकरेंच्या आमदाराने नगरपालिकेत तहसीलदारांना कोंडल्यानंतर कारवाई

Akola News: अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये अखेर विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 'एचडीएफसी अर्गो' या विमा कंपनीचे राज्य प्रतिनिधी आणि विभागीय प्रतिनिधीवर गुन्हे दाखल झाले आहेत.

अकोलाअकोला जिल्ह्यातील (Akola News) बाळापूरमध्ये अखेर विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल (Akola Crime) करण्यात आले आहेत. 'एचडीएफसी अर्गो' या विमा कंपनीचे राज्य प्रतिनिधी प्रकाश श्रीवास्तव आणि विभागीय प्रतिनिधी सुनिल भालेराव या दोघांवर काल रात्री हे गुन्हे दाखल झाले आहेत. 'एचडीएफसी अर्गो' कंपनीने वर्ष 2023-24 मधील खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी कागदपत्रे कृषी विभागाला अनेकदा मागणी करूनही सादर केली नाहीत.  पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दावा यादी, सर्वेक्षण झालेली यादी, पात्र आणि अपात्र यांची कारणांसह यादी, खरीप आणि रब्बी पंचनामे प्रतीसह इतर दस्ताऐवज कंपनीने कृषी विभागाला सादर केले नाहीत.

यामूळे बाळापूर तालुक्यातील 7 हजार 556 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा योग्य परतावा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालं. परिणामी, कंपन्यांनी परतावा न देतांना राज्यात हजारो कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमदार नितीन देशमुखांनी  (Nitin Deshmukh) केला होता. 

'एचडीएफसी अर्गो' कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल

तर दुसरीकडे काल गुरुवारी  बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी पिकविम्याच्या विषयावर बाळापूरचे तहसीलदार आणि तालूका कृषी अधिकाऱ्यांना बाळापूर नगरपालिकेच्या मुख्य सभागृहात कोंडलं होतं. विमा कंपन्यांच्या तक्रारीविरोधात नगरपालिकेत आमदार देशमुखांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला विमा कंपन्यांचे अधिकारी गैरहजर असल्याने आमदार देशमुख चांगलेच संतप्त झाले होते. त्यांनी तब्बल दहा तास या अधिकाऱ्यांना डांबल्यानंतर कृषी विभागाने कंपनीविरोधात पोलीस तक्रार केलीय.

दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात आलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही आमदार देशमुखांनी टीका केलीय. तर आता याच प्रकरणी जिल्हा कृषी अधिक्षक शंकर किरवे यांच्या तक्रारीवरून कंपनीवर बाळापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय.

नेमकं प्रकरण काय?

शेतकऱ्यांच्या पीकविमाबाबत अनेक तक्रारी आहेत. कुणाला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, कुणाला विमा उतरवताना अडचणी येत आहेत तर काही तांत्रिक कारणं आहेत. या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. नगरपालिकेत ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र विमा कंपन्यांचे आणि कृषी विभागाचे अधिकारी या बैठकीसाठी आलेच नाहीत. त्यामुळे नितीन देशमुख प्रचंड संतापले. त्यांनी थेट तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलं.

जोपर्यंत विमा कंपनीचे पदाधिकारी याठिकाणी येत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढच नाहीत तोवर तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही,सर्व दरवाजे लावून घ्या असंही आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आणि तक्रारी आहेत. अनेक शेतकऱ्यांना विम्याचे पैसै मिळात नाहीत. तर अनेकांना पीक विमा भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh) बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सांगण्यात आलेलं होतं. मात्र त्यांनी या बैठकीला उपस्थित न राहिल्याने देशमुखांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी थेट तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवल्याचं समोर आलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 12 Jan 2025 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 6.30 AM | 12 Jan 2025 | ABP MajhaABP Majha Headlines | 6.30 AM | 12 Jan 2025 | एबीपी माझा हेडलाईन्स | Maharashtra PoliticsVile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
Embed widget