एक्स्प्लोर
अपहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा

सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील अपहार प्रकरणी तत्कालीन सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रशासकांनी चौकशी पूर्ण केल्यानंतर बार्शी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.
बार्शी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने सोपल समर्थक संतप्त झाले आहेत. समर्थकांनी बाजारपेठ बंद करायला लावली. मात्र शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत बाजारपेठ पूर्ववत करत आहेत. त्यामुळे बार्शीत तणावपूर्ण शांतता आहे.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या अपहाराची प्रशासकांकडून चौकशी सुरु होती. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र सरकारने सुडबुद्धीने कारवाई केली, असा आरोप करत सोपल समर्थक आक्रमक झाले आहेत.
बार्शी बाजार समितीतील 2015 -16 च्या अपहार आणि गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन सभापती आमदार सोपल यांच्यासह 18 संचालकांवर बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा विशेष लेखा परिक्षक व्ही व्ही डोके यांनी हा गुन्हा दाखल केला. बाजार समितीमध्ये सुमारे 19 लाख रुपयांचा अपहार, तर 86 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नाशिक
विश्व
Advertisement
Advertisement
























