एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संभाजी भिडेंवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा
श्री शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर बेळगाव पोलिसांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
बेळगाव : श्री शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर बेळगाव पोलिसांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संभाजी भिडे हे गुरुवारी येळ्ळूर येथे महाराष्ट्र मैदानात झालेल्या कुस्त्यांना उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करा. असं आवाहन केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
'विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करा. कुस्ती मैदानाच्या विरोधातील व्यक्तींना त्यांची जागा दाखवून द्या. आजवर अनेक कुस्त्यांची मैदाने पाहिली पण येळ्ळूरच्या मैदानासारखे कुस्ती मैदान कोठेही पाहिले नाही.' असं संभाजी भिडे यावेळी म्हणाले होते.
‘समितीच्या उमेदवारांना आगामी निवडणुकीत विजयी करा.’ संभाजी भिंडेंच्या या वक्तव्याविरोधात त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement