एक्स्प्लोर
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईवरच ट्रॅक्टर घातला
वाशिम जिल्ह्यात शेतीच्या वादातून आपल्या जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरखाली टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावातील ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाशिम : वाशिम जिल्ह्यात शेतीच्या वादातून आपल्या जन्मदात्या आईवरच ट्रॅक्टर घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावातील ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाशिममधील मुंगळा गावात गुरुवारी शेतीमध्ये पेरणीच्या वादात दोन गटात तुफान बाचाबाची झाली. 40 वर्षापासून हा शेतीचा वाद सुरु आहे. मुंगळा शिवारात कैलास दळवी हे आपल्या कुटुंबासोबत पेरणी करताना गावातीलच राऊत कुटुंब त्याठिकाणी ट्रॅक्टर घेवून आले. शेती कुणाची आहे यावरुन दळवी आणि राऊत कुटुंबात वाद झाला. यावेळी कैलास दळवी यांनी आपल्या आईलाच ट्रॅक्टरसमोर टाकलं.
हा प्रकार इथेच थांबला नाही, तर राऊत कुटुंबांने कैलास दळवी आणि त्यांच्या पत्नीला झाडाला बांधून ठेवले. या सर्व प्रकारानंतर कैलास दळवी यांनी राऊत कुटुंबाविरोधात मालेगाव पोलिसात तक्रार दिली आहे.
राऊत कुटुंबांनेदेखील कैलास दळवी यांच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. हा शेतीचा वाद न्यायप्रविष्ट असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र झालेला हा प्रकार सध्या सोशल मीडियावर आल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement