एक्स्प्लोर

भात लागवडीवर होणारा वारेमाप खर्च वाचवण्यासाठी शेतकऱ्याकडून SRT तंत्रज्ञानाचा वापर

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एसआरटी तंत्रज्ञानाचा वापर करून भात लागवड पूर्ण केली आहे. एसआरटी तंत्रज्ञानामुळे भात लागवडीवर होणारा वारेमाप खर्च कमी होत आहे.

पालघर : पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यामुळे तालुक्यात सध्या भातपेरणीचा मोसम जोरात सुरू झाला आहे. त्यामुळे बळीराजाची पेरणीसाठीची लगबग सुरू आहे. मात्र, पारंपरिक भातशेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत वाडा तालुक्यातील सापणे बु. गावातील शेतकरी संजय तुकाराम भोईर यांनी सगुणा राईस तंत्रज्ञान(एसआरटी) पद्धतीने भात लागवड पूर्ण करून भात पेरणीचा आणि लागवडीचा प्रश्नच मिटवला आहे. संजय भोईर यांनी आपल्या शेतात मागील वर्षांपासून हा प्रयोग करण्यास सुरुवात केली. मागील वर्षी ते त्यात यशस्वी झाल्याने त्यांनी या वर्षी आपल्या चार ते साडेचार एकरच्या पूर्ण शेतीमध्ये एसआरटी पद्धतीने लागवड केली आहे. त्यांनी भात लागवडीवर होणार वारेमाप खर्च व भट लागवडीच्या वेळी जाणवणारी मजुरांची चणचण यावर मात केली आहे.

एसआरटी पद्धतीने भाताची लागवड करण्यासाठी संजय भोईर यांनी दोन लोखंडाचे सांगाडे तयार केले आहेत. पहिल्यांदा ट्रॅक्टरने पूर्ण शेतीची उखळणी केल्यानंतर त्यांनी वाफे तयार करुन घेतले. लोखंडी सांगाड्याच्या सहायाने जमिनीत थोडे खड्डे तयार झाल्यानंतर त्या खड्ड्यांमध्ये 4 ते 5 पाच भाताचे दाणे टाकून त्यावर पुन्हा माती टाकली जाते. त्यामुळे बियाणे योग्य पद्धतीने जमिनीत पुरले जातात भात पेरताना दोन रोपांमधील अंतर 25 बाय 25 सेंटीमीटर व दोन रांगेमधील अंतर अर्धा फूट ठेवले आहे. त्यामुळे सर्व रोपं आणि सर्व रांगा सारख्या दिसतात. यामुळे आंतरमशागत करताना शेतकर्‍यांना त्रास होत नाही. त्यांनी आपल्या चार एकर जागेमध्ये एसआरटी पद्धतीने भात लागवड करण्यासाठी मागील पाच दिवसांपासून 10 माणसे कामाला घेतली असून चार साडेचार एकर जागेसाठी त्यांना 10 ते 12 हजार रुपये खर्च आला. यासाठी फक्त 40 किलो बियाणे लागले आहे. विशेष म्हणजे भात लागवड करताना लागणारी मजुरांची चणचण यावर देखील त्यांनी मात केली आहे.

..अन् शेतकऱ्यांच्या पायाला भेगा का पडतात? याचा अनुभव मला आला : खासदार संभाजीराजे

या पद्धतीमुळे शेतकऱ्याची आर्थिक बचत या पद्धतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा वाफे तयार केल्यास पुढील पाच वर्षे लागवड करण्यासाठी वापरता येतात. त्यामुळे दरवर्षी नांगरणी, लागवड, गवत काढणी यावर होणारा मोठा खर्च वाचतो. शेतकऱ्यांनी या पद्धतीचा वापर करून पीक घेतल्यास याच शेतात रब्बी हंगामात दुसरे पीक घेण्यासाठी रासायनिक खताची गरज नसल्याचे संजय भोईर यांनी सांगितले. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून आपली भात लागवड करावी, असे आवाहन संजय भोईर यांनी केले आहे. जर भात लागवड केली तर दरवर्षी लागणार्‍या खर्चापेक्षा 50 टक्के खर्च कमी येतो. त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकर्‍यांसाठी वरदान ठरू पाहत आहे. जर या पद्धतीने भात लागवड केली तर येणारे उत्पादनही पारंपरिक लागवडीपेक्षा जास्त येते. शिवाय पिकांची रोग प्रतिकारशक्‍ती जास्त असते.

Farmer Loss | लॉकडाऊनमुळे रेशीम उत्पादक संकटात,लाखोंचा खर्च केलेल्या शेतीवर नांगर फिरवण्याची वेळ

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget