एक्स्प्लोर

रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई-पुणे, ठाणे-पुणे मार्गावर एसटीच्या 70 जादा बसेस

मंकी हिल ते कर्जत या स्टेशनच्या दरम्यान मुंबई-पुणे मार्गावर पुन्हा एकदा एक महिन्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. यादरम्यान अनेक एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे.

मुंबई : मुंबई - पुणे रेल्वे मार्गावरील मंकी हिल ते कर्जत या स्थानकादरम्यान तांत्रिक काम करण्यात येणार असल्याने रेल्वे प्रशासनाने 30 नोव्हेंबर पर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे म्हणून एसटी महामंडळातर्फे नियमित फेऱ्यांशिवाय मुंबई-पुणे, ठाणे-पुणे मार्गावर 70 जादा बस सोडण्यात येणार आहे. मंकी हिल ते कर्जत या स्टेशनच्या दरम्यान मुंबई-पुणे मार्गावर पुन्हा एकदा एक महिन्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. मुंबई पुणे रेल्वेमार्गावर असलेल्या घाटात अनेक वेळा तांत्रिक बिघाड किंवा दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यासाठी उपाय म्हणून मध्य रेल्वे या मार्गावर मेगाब्लॉक घेऊन काम करणार आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत हे काम सुरू राहील असा अंदाज आहे. यादरम्यान अनेक एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस, मुंबई पंढरपूर मुंबई एक्सप्रेस, मुंबई विजापूर मुंबई एक्सप्रेस, पनवेल पुणे पनवेल पॅसेंजर आणि पनवेल नांदेड पनवेल साप्ताहिक एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहेत. याबरोबरच 22 एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. मुंबई कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, मुंबई हैदराबाद मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस, एलटीटी विशाखापट्टणम एल टी टी एक्सप्रेस, एलटीटी हुबळी एलटीटी एक्सप्रेस या गाड्या 31 नोव्हेंबर पर्यंत पुणे स्थानकापर्यंतच चालवण्यात येतील. तर भुसावळ पुणे भुसावळ ही गाडी दौंड मार्गे चालवण्यात येणार आहे. या मार्गावर 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता मात्र या तांत्रिक बाबी पूर्ण झाल्याने पुढील एक महिना हा ब्लॉक राहील. यामुळे दिवाळीचे निमित्त साधून मुंबई बाहेर गेलेल्या अनेक प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. शिवनेरी बस वाहतुकीचे मुंबई-पुणे-मुंबई मार्गावर सरासरी 278 फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. तसेच 36 निमआराम वाहतुकीच्या फेऱ्या मुंबई-पुणे मार्गावर सुरु आहेत. याबरोबरच मुंबई, परळ, कुर्ला येथून पुणे मार्गे जाणाऱ्या 290 फेऱ्या उपलब्ध आहेत. म्हणजेच पुणे मार्गावर जाण्यासाठी दररोज 465 फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. तसेच प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून ठाणे विभागाने - 20, मुंबई विभागाने- 15, पुणे विभागाने- 15, शिवनेरी बससेवेच्या-20 अशा 70 जादा फेऱ्यांचे दररोज नियोजन केले आहे. या व्यतिरिक्त आवश्यकता भासल्यास प्रवाश्याच्या गर्दीनुसार जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनांनं दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Embed widget