एक्स्प्लोर

Exclusive : राज्यातील कोविड निर्बंध शिथिल करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्वाची माहिती, म्हणाले...

महाराष्ट्रातील निर्बंध हटण्यासंबंधी तसेच लसीकरण आणि राज्य सरकारची तयारी अशा विविध मुद्द्यांवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी एबीपी माझाने Exclusive संवाद साधला. 

मुंबई : राज्यामध्ये कोरोनाचं प्रमाण दुसऱ्या लाटेत कमी होत असल्याचं चित्र असलं तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काळजी घेतली जात आहे. राज्यात कोरोनासंबंधी अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. हे निर्बंध हटण्यासंबंधी तसेच लसीकरण आणि राज्य सरकारची तयारी अशा विविध मुद्द्यांवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी एबीपी माझाने Exclusive संवाद साधला. 

यावेळी राजेश टोपे म्हणाले की, राज्यात आपण टप्प्याटप्प्याने निर्बंधामध्ये सुट देत आहोत. विमानतळावर निगेटीव्ह अहवाल असल्याशिवाय परवानगी नसायची, त्यांना आयसोलेट केलं जायचं. आता लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर आपण प्रवाशांना मुंबईत प्रवेश देत आहोत. कदाचीत रेल्वेजवळ तेवढं मनुष्यबळ नसेल. तसेच येवढ्या गर्दीत प्रवाशांची तपासनी होईल का, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अद्याप लोकलबाबत निर्णय झालेला नसेल. पण दोन लस घेतल्या असतील तर अनेक निर्बंध शिथिल करायला हवेत. या विचारांच्या बाबतीत कोणाचंही दुमत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि टाक्स फोर्स योग्य निर्णय घेतील, असा मला आशावाद आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

ते म्हणाले की, तिसरी लाट येऊ शकते. ही लाट कधी येणार हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे. आपण निर्बंध पाळले, लसीकरण केलं तर ही लाट आपण थोपवू शकतो. आपण लसीकरण जोरात केलं तर लाट रोखू शकतो, असं राजेश टोपे म्हणाले. 

राजेश टोपे म्हणाले की, आपण राज्यात एक्सपर्टशी बोलूनच निर्णय घेतो.  ICMR ने पहिला रुग्ण आढळल्यापासून काही नियम आखून दिले आहेत. त्या नियमानुसारच महाराष्ट्र काम करत आहे. ICMR ने सिरो सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांनी आम्हाला सांगावे, प्रोटोकॉल द्यावा. कशाप्रकारे निर्बंधामध्ये सुट देता येईल, या संदर्भात सुचना द्याव्यात. कारण आताच केंद्राची टिम येऊन गेली त्यांनी निर्बंध पाळणे, टेस्टींग वाढवणे, अशा सुचना दिल्या आहेत. आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नियम पाळत आहोत. ICMR ने मार्गदर्शन केल्यास आम्हाला निर्णय घेता येईल. सेरो सर्व्हेनुसार लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात अॅन्टिबॉडिज विकसित झाल्या आहेत. ही चांगली बाब आहे, असं टोपे म्हणाले. 

टोपे म्हणाले की, आमची अपेक्षा आहे की, महिने दोन महिन्यात राज्याचे लसीकरण 100 टक्के पूर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. पण त्या गतीनं लस उपलब्ध व्हायला हवी. केंद्राने लसीकरणाला वेग देण्यासाठी मदत करायला हवी. आम्ही रोज जशी लस येईल तसं अडीच-तीन लाख लसीकरण करतोय. लस जास्त प्रमाणात मिळाली तर हे प्रमाण वाढेल. जर 70 ते 80 टक्के लसीकरण झाले. तर सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. ती या महामारीमध्ये गरजेची असल्याचे टोपे म्हणाले. 

VIDEO : पाहा राजेश टोपे यांची संपूर्ण मुलाखत

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Babanrao Taywade on Manoj Jarange Patil: तर मग हा खटाटोप कशाला? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मनोज जरांगेंना रोखठोक सवाल, आंदोलनावरून राज्य सरकारलाही थेट इशारा
तर मग हा खटाटोप कशाला? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मनोज जरांगेंना रोखठोक सवाल, आंदोलनावरून राज्य सरकारलाही थेट इशारा
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Embed widget