कल्याण डोंबिवलीतील बिल्डर फसवणूक प्रकरणात ईडीची एंट्री, केडीएमसीकडे कागदपत्रांची मागणी
Kalyan Dombivli : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत खोटी कागदपत्र व सही शिक्के वापरत रेरा प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळवल्याचे निदर्शनास आल्याने केडीएमसीने पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
मुंबई : कल्याण डोंबिवलीत बिल्डर फसवणूक ( Builder Fraud Case In Kalyan Dombivli ) प्रकरणात आता ईडीची (ED) एन्ट्री झाली आहे. ईडीकडून केडीएमसीकडे कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. केडीएमसीच्या खोट्या सही शिक्क्याचा वापर करुन परवानगी मिळविल्याचे भासवून त्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळविल्या प्रकरणी डोंबिवली मानपाडा व रामनगर पोलिस ठाण्यात 66 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. दरम्यान, ईडीने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे या प्रकरणातील कागदपत्रंची मागणी केली आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे रेराचीचं रजिस्ट्रेशन घेत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 66 बिल्डर विरोधात पालिकेतर्फे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीने माहिती मागितली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत पालिकेची खोटी कागदपत्र व सही शिक्के वापरत रेरा प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळवल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणी केडीएमसीने पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारीच्या आधारे मानपाडा आणि राम नगर पोलिस ठाण्यात तब्बल 66 बिल्डरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात एसआयटी चौकशी करीत आहे. या प्रकरणात नागरिकांसह सरकार आणि सरकारी प्राधिकरणाची फसवणूक झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर स्वरुपाचे आहे. त्यामुळेच ईडीकडून आता या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे.
मोठ्या आर्थिक घोटाळ्यांची माहिती ईडीला दिली जाते. एसआयटीने ही माहिती ईडीला दिली होती. त्या आधारेच ईडीने महापालिका आयुक्तांकडे या फसवणूक प्रकरणातील कागदपत्रंची मागणी केली आहे. महापालिका प्रशासनाने ईडीने त्यांच्याकडे कागदपत्रंची मागणी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडीची एंट्री होऊ शकते. या प्रकरणाचा तपास ईडी देखील करु शकते. याबाबत बनावट कागदपत्र तयार करत या बनावट कागदपत्रांच्या आधारे रेराचीचं रजिस्ट्रेशन घेत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 66 बिल्डर विरोधात पालिकेतर्फे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीने माहिती मागितली आहे ती सादर करन्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे.
दरम्यान ईडीची या प्रकरणात एंट्री होणार असल्यास त्याचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी स्वागत केले आहे. बिल्डरसह महापालिका आणि रेराच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जावी अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.