एक्स्प्लोर
भूकंपाच्या धक्क्याने तलासरी, डहाणूमधली गावे पुन्हा हादरली, नागरिकांचा जीव टांगणीला
गेल्या वर्षभरापासून पालघर, डहाणू, तलासरी भागात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. या भागात काल पुन्हा एकदा सौम आणि मध्यम स्वरुपाच्या भूकंपाचे धक्के बसले.
पालघर : डहाणू, तलासरी तालुक्याचा भाग जोरदार भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा एकदा हादरला आहे. गेल्या दीड वर्षांपासून हजारो सौम्य व मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के या परिसरात बसत आहेत. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील परिसर गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाच्या जोरदार धक्याने हादरला. भूकंपाच्या धक्क्याने भयभीत होऊन नागरिक घराबाहेर पडले. या भूकंपामुळे कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी आठ आणि गुरुवारी पहाटेपासून एकपाठोपाठ सौम्य मध्यम भूकंपाचे धक्के बसले. मात्र यापैकी 7.20 वाजता झालेल्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 3.5 मॅग्निट्यूड असल्याची नोंद भारतीय हवामान खात्यामार्फत करण्यात आली आहे. तर सोमवारी मध्यरात्री 1 वाजून 35 मिनिटांनी 3.9 मॅग्निट्यूड क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्यावेळी आसपासच्या भिल्लाड, सिलवासा तलासरी, डहाणू, धुंदलवाडी, दापचरी, वंकास, झाई, बोर्डी, उधवा, कासा, उर्से तसेच गुजरात राज्याचा उंबरगाव पर्यंत धक्के बसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
सातत्याने एकापाठोपाठ होणाऱ्या भूकंपांनी नागरिकांच्या मनात भीतीचे काहूर उठवले आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या भूकंपाने अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत, तर काही भिंती दुभंगण्याच्या स्थतीत आहेत. अशा जमिनी हादरवून सोडणाऱ्या भूकंपाने डोक्यावरील छत आणि घर कोसळले तर कुठे जायचे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. भूकंपाने स्थानिक नागरिक पुरते हैराण झाले आहेत. आता पर्यंत भूकंपाच्या धक्क्याने दोन जणांना प्राण गमवाले लागले आहेत.
सोमवारी झालेल्या भूकंप नोंदी
सोमवारी 2.6, 2.4 , 2.2, 3.9, 3.3, 2.9, 1.9, 2.3 मॅग्निट्यूड क्षमतेचे भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती गुजरात सिस्मोलॉजिस्टिक रिसर्च सेंटरने दिली आहे. यामध्ये मध्यरात्री 1.35 वाजता 3.9 मॅग्निट्यूड क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. तर गुरुवारी पहाटे 4.48 पासून एकूण 4 धक्के बसले. त्यामध्ये 7: 20 वाजता 3.2 मॅग्निट्यूड क्षमतेचा जोरदार धक्का होता.
वारंवार होणाऱ्या भूकंपाने हैराण झालेल्या नागरिकांनी आता डहाणू आणि तलासरी तालुका भूकंपग्रस्त घोषित करावा, अशी मागणी केली आहे.
भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम
नोव्हेंबर आणि डिसेंबर 2018
11 नोव्हेंबर - 3.2 रिश्टर स्केल
24 नोव्हेंबर - 3.3 रिश्टर स्केल,
1 डिसेंबर - 3.1 व 2.9 रिश्टर स्केल
4 डिसेंबर - 3.2 रिश्टर स्केल
7 डिसेंबर - 2.9 रिश्टर स्केल
10 डिसेंबर 2.8 आणि 2.7 रिश्टर स्केल
2019
20 जानेवारी - 3.6 रिश्टर स्केल
24 जानेवारी - 3.4 रिश्टर स्केल
1 फेब्रुवारी - 3.3,3.5,3.0,4.1,3.6,3.5 रिश्टर स्केल
7 फेब्रुवारी - 3.3 रिश्टर स्केल
13 फेब्रुवारी - 3.1 रिश्टर स्केल
20 फेब्रुवारी - 2.9, 2.9, 3.1 रिश्टर स्केल
1 मार्च - 3.2, 4.3 रिश्टर स्केल
9 मार्च - 2.8 रिश्टर स्केल
10 मार्च - 3.5 रिश्टर स्केल
31 मार्च - 3.2 रिश्टर स्केल
2 एप्रिल - 3.0 रिश्टर , 2.9 रिश्टर स्केल
9 एप्रिल - 3.0 रिश्टर स्केल
15 एप्रिल - 3.4 रिश्टर स्केल
12 मे - 2.6 रिश्टर स्केल
10 जुलै - 2.6 रिश्टर स्केल
20 जुलै - 3.5 रिश्टर स्केल
24 जुलै - 3.6, 3.8, 2.8 रिश्टर स्केल
25 जुलै - 4.8, 3.6 रिश्टर स्केल
31 जुलै - 3.00 रिश्टर स्केल
13 ऑगस्ट - 3.2 रिश्टर स्केल
21 ऑगस्ट - 2.5 रिश्टर स्केल
20 सप्टेंबर - 3.3 रिश्टर स्केल
21 सप्टेंबर - 3.2 रिश्टर स्केल
2 सप्टेंबर - 3.4 रिश्टर स्केल
24 सप्टेंबर - 2.8 रिश्टर स्केल
26 ऑक्टोंबर - 2.7 रिश्टर स्केल
18 नव्हेंबर - 3.9, 3.3, 2.9, 2.3, 24 रिश्टर स्केल
21 नव्हेंबर - 3.5 रिश्टर स्केल
आतापर्यंत भूकंपाचे एकूम 53 धक्के बसल्याची नोंद करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement