एक्स्प्लोर
PSI दारु पिऊन टाईट, रिव्हॉल्वर दाखवून बारमध्ये राडा
अमोल मालुसरे असं या पीएसआयचं नाव आहे. तो बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
अहमदनगर: पाथर्डीत मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकानं राडा केला. दारुच्या नशेत तऱ्हाट झालेल्या पोलीस उपनिरीक्षकानं बिअर बारमध्ये मारझोड केली. इतकंच नाही तर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मालक, ग्राहक आणि सोडवायला आलेल्या पीएसआयलाही चोप दिला.
अमोल मालुसरे असं या पीएसआयचं नाव आहे. तो बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
साडेचार हजाराचं बिल मागितल्यानं साहेबांचा पारा चढला आणि त्यानं थेट रिव्हॉल्व्हर काढून धमकावण्यास सुरुवात केली.
काउंटरवर रिव्हॉल्व्हर आपटून आपटून त्याचे तुकडे केले. यावेळी मालुसरेनं नशेत मालक आणि ग्राहकांना चोपण्यास सुरुवात केली. यावेळी सोडवायला आलेल्या पीएसआयलाही त्यानं मारझोड केली.
मधुबन परमिटरुममध्ये रात्रीच्या सुमारास हा राडा झाला. याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून मालुसरेला अटक करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement