एक्स्प्लोर
बीड शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, हल्ल्यात 20 पेक्षा अधिक जखमी
जखमी नागरिक कारंजा, शहेनशाहनगर, अजिजपुरा या भागातील आहेत. लहान मुलांच्या गालावर, हातावर कुत्र्याने चावा घेतल्याने शहरामध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जखमींना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा कुत्रा अजूनही मोकाट आहे.

बीड : पिसाळलेल्या एका कुत्र्याने आज बीड शहरात धुमाकूळ घातला असून या कुत्र्याच्या हल्ल्यात 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे हा कुत्रा अजूनही मोकाट आहे. या कुत्र्याने लहान मुलांच्या गालावर, हातावर, पायावर चावा घेतला आहे. जखमींमध्ये कारंजा, अजीजपुरा यासह आदी भागातील नागरिकांचा समावेश असून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पिसाळलेल्या कुत्र्याने दिसेल त्याचा चावा घेण्यास सुरुवात केली. रस्त्याने जाणार्या आणि घराबाहेर थांबलेल्या लोकांवर कुत्र्याने हल्ला केला. यामध्ये सय्यद अदनान, महेविश शब्बीर पठाण, इंदुबाई जावळे, आमेर शेख जावेद, अब्दुल मुखिद, शेख फैसल ताहेर, अब्दुल हादी खान, पठाण महेबूब गफूर यांच्यासह अन्य 20 ते 25 जणांना कुत्र्याने चावा घेतला.
जखमी नागरिक कारंजा, शहेनशाहनगर, अजिजपुरा या भागातील आहेत. लहान मुलांच्या गालावर, हातावर कुत्र्याने चावा घेतल्याने शहरामध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जखमींना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा कुत्रा अजूनही मोकाट आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement