एक्स्प्लोर

ABP Majha Exclusive : आत्महत्या करण्याआधी दीपाली चव्हाण यांचं पतीला भावनिक पत्र

ABP Majha Exclusive : दीपाली चव्हाण (Deepali Chavan Suicide Case) यांच्या आत्महत्या प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्याला नागपुरातून अमरावती पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. शिवकुमार असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. अशातच दीपाली चव्हाण यांनी नवरा आणि आईसाठी आत्महत्येपूर्वी लिहिलेलं भावनिक पत्र समोर आलं आहे. 

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात डीएफओ विनोद शिवकुमार या अधिकाऱ्याला अटक केली आहे. दरम्यान लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या दीपाली चव्हाण आणि डीएफओ विनोद शिवकुमार यांच्यामध्ये फोन वरून जो संवाद झाला त्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. 

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्याला नागपुरातून अमरावती पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. शिवकुमार असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. ते डीएफओ पदावर कार्यरत आहे. दीपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये, माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार हे गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच असतील, त्यांच्यावर कारवाई करा असं लिहिलं आहे. दरम्यान, दीपाली चव्हाण यांनी नवरा आणि आईसाठी आत्महत्येपूर्वी लिहिलेलं भावनिक पत्र समोर आलं आहे. 

दीपाली चव्हाण यांनी नवरा आणि आईसाठी आत्महत्येपूर्वी लिहिलेलं भावनिक पत्र :

प्रिय नवरोबा...

लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलत बोलत मी तुम्हाला लिहीत आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जादा कारण आता मी जीव देत आहे.

साहेब मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत तू नेहमी म्हणतोस माझी हार्ड डिस्क भरून गेलेय. खरंच भरून गेलेय. साहेबाने मला पागल करून सोडलय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात.

मी खूप सहन केलं पण आता माझी लिमिट खरच संपली आहे. यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते पण सुट्टी देखील तो मंजूर करत नाही. तुझ्याशी बोलायला हवं होतं मी तुझी वाट पाहत होते घरी यायची. आज आई पण गावी गेली. घरी कोणीच नाहीये घर खायला उठत आहे. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर. जगातला सगळ्यात चांगला नवरा आहेस, माझ्यावर खूप प्रेम करतोस. मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्रास, त्यांच त्रास देनं कमी झालं नाही.. 

मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं.. मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जात आहे.. आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली.. माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर.. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण आज मी तुला सोडून जात आहे.. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे, त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे..

आपला संसार अपूर्ण राहिला पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू.. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस मीच कमी पडत आहे.. माझी हार्ड डिक्स फुटत आहे त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे मला माफ कर माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार डीसीएफ शिवकुमार हा आहे..

दिपाली...

Deepali Chavan suicide case : दीपाली चव्हाण आणि डीएफओ शिवकुमार यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल

दिपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्येही शिवकुमार यांच्यावर आरोप

दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार हे गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच असतील, त्यांच्यावर कारवाई करा असं लिहिलं आहे. माझ्यासोबत जे झाले ते इतरांसोबत होऊ नये असे आत्महत्या केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्त्येपूर्वी केलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे. वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.  ही सुसाईड नोट अर्थात चव्हाण यांनी  अपर प्र.भु.व. संरक्षक क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या नावे केला आहे. दीपाली चव्हाण यांनी लिहलेल्या चार पानांच्या या पत्रात त्यांनी आपण का आत्महत्या करत आहोत याबाबत सविस्तर लिहून दिलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणारCNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?ABP Majha Headlines : 11 PM : 05 Jully : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Embed widget