एक्स्प्लोर
Advertisement
मृत कोरोना रुग्णाच्या पत्नीची तपासणी न करताच परत पाठवलं!, धुळ्यातील धक्कादायक प्रकार
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या पत्नीची कोणतीही तपासणी न करता तिला परत पाठवल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात समोर आला आहे. संतापजनक म्हणजे सदर महिलेला 70 किलोमीटर पायी चालत गावाकडे परत यावं लागलं.
धुळे : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील रुग्णाच्या पत्नीची कोणतीही तपासणी न करता तिला परत पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतापजनक म्हणजे सदर महिलेला 70 किलोमीटर पायी चालत गावाकडे परत यावं लागलं. ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. सदर महिलेस शिरपूर जवळील प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीजवळ अडवण्यात आलं. तिथून तिला शिरपूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणेच्या बेजबाबदार कारभाराबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांविरोधात कारवाई करण्याची करण्याची मागणी केली जात आहे.
22 मे रोजी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील 48 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याला रुग्णवाहिकेमधून धुळे येथे पाठवण्यात आलं होतं. सोबत त्याच्या पत्नीलाही रवाना करण्यात आलं होतं. त्या रुग्णाचा सोमवारी मृत्यू झाला. रात्री उशिरा त्याचा अंत्यविधी झाला.
शिरपूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लेखी कळवूनही वैद्यकीय महाविद्यालयाच्या यंत्रणेनं या महिलेचे नमुने घेतले नसल्याचा आरोप संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी, स्थानिक नागरिकांनी केला आहे. सदर महिला अशिक्षित असल्यानं मंगळवारी सकाळी धुळ्याहून पायी येण्यासाठी निघाली. 70 किमीचे अंतर पायी चालून शिरपूर शहराजवळील प्रियदर्शनी सुतगिरणीजवळ पोहचल्यावर तिला नातेवाईकांनी ओळखलं. या महिलेस त्याठिकाणी थांबवण्यात आलं.
यानंतर सरपंच शैलेंद्र चौधरी घटनास्थळी पोहचले. त्यांनी माहिती दिल्याने तहसीलदार आबा महाजन, आरोग्य अधिकारी डॉ.प्रसन्न कुलकर्णी, एपीआय सचिन साळुंखे पोहचले. यावेळी ग्रामस्थांनी धुळे येथील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय महिलेस जाऊ न देण्याची भूमिका घेतली. मात्र प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी फोनवरून संबंधितांची समजूत घातली. त्यानंतर महिलेस शिरपूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
भविष्य
आरोग्य
Advertisement