एक्स्प्लोर
शिर्डीत होणारी दलित-मराठा ऐक्य परिषद कोल्हापुरात
मुंबईः शिर्डीत होणारी दलित-मराठा ऐक्य परिषद 11 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात होणार आहे, अशी माहिती रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
नाशिकच्या दौऱ्यात शिर्डीत होणारी परिषद तूर्तास रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रामदाल आठवलेंनी दिली होती. त्यानतंर आता या परिषदेचं कोल्हापुरात आयोजन करण्यात आलं आहे.
मराठा आणि दलित समाजात कोणतीही दरी निर्माण होऊ नये, या उद्देशाने रामदास आठवले यांनी दलित-मराठा ऐक्य परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेसाठी मराठा संघटनांसह विविध संघटनांना आमंत्रण देण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement