एक्स्प्लोर
राम कदम यांची जीभ छाटा, पाच लाख रुपये मिळवा : सुबोध सावजी
राम कदम यांच्याविरोधात संपूर्ण राज्यात संताप उफाळला आहे.
बुलडाणा : घाटकोपरमधील भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. त्यातच आता बुलडाण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राम कदमांबाबत चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. राम कदम यांची जीभ छाटून आणा आणि पाच लाख रुपये घेऊन जा, असं वक्तव्य सुबोध सावजी यांनी केलं आहे.
राम कदम यांच्याविरोधात संपूर्ण राज्यात संताप उफाळला आहे. अनेकांनी राम कदम यांच्यावर तोंडसुख घेतलं, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन त्यांच्या प्रतिमेचं दहन केलं. जोडेमारो, बांगड्यांची माळ, चपलेचा हार अशा सर्व मार्गांनी चीड व्यक्त केली. आता सुबोध सावजी यांनी राम कदम यांची जीभ छाटून आणणाऱ्याला पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य
"कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले.
राम कदम यांचा माफीनामा
दहीहंडी उत्सवात महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनी अखेर माफी मागितली आहे. राम कदम यांनी ट्विटरवर आपला माफीनामा सादर केला आहे. माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. राम कदम यांनी लिहिलं आहे की, "माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुन:श्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement