Coronavirus Maharashtra Live Updates | पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 202 जण कोरोनामुक्त
Coronavirus in Maharashtra Live : राज्यात शुक्रवारी (8 मे) कोरोनाच्या तब्बल 1089 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,063 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 37 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैकी 25 जण मुंबईचे तर पुण्यातील 10, जळगाव आणि अमरवती शहरामध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 731 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 169 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुणे ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. दोन्ही शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना व्हायरसविषयी सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडी आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
LIVE
Background
Coronavirus in Maharashtra Live Updates: राज्यात शुक्रवारी (8 मे) कोरोनाच्या तब्बल 1089 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,063 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 37 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैकी 25 जण मुंबईचे तर पुण्यातील 10, जळगाव आणि अमरवती शहरामध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 731 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 169 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 12 हजार 350 नमुन्यांपैकी 1 लाख 92 हजार 197 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 19,063 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 39 हजार 531 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 13 हजार 494 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 3301 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
काल झालेल्या मृत्यूंपैकी 19 पुरुष तर 18 महिला आहेत. त्यातील 17 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 16 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 4 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 37 रुग्णांपैकी 27 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.