Corona Update | राज्यात आज 3827 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 1935 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 3827 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 1,24,331 आहे. तर दिवसभरात 142 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1935 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात आज 3827 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे. राज्यात आज 1935 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 62 हजार 773 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 55 हजार 651 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात 142 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. यासह आतापर्यंत 5893 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत 114, ठाणे 2, वसई विरार 5, सोलापूर 1, औरंगाबाद 8, रायगड, नाशिक, धुळे, जळगाव येथील प्रत्येकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार आज झालेल्या मृत्यूंमध्ये 89 पुरुष आणि 53 महिला आहेत. यात 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे 74 रुग्ण, 40 ते 59 वयोगटातील 57 रुग्ण आणि 40 वर्षाखालील11 रुग्णांचा समावेश आहे.
राज्यात सध्या 60 शासकीय आणि 43 खाजगी अशा एकूण 103 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत 7 लाख 35 हजार 674 नमुने प्रयोगशाळांत पाठवण्यात आले असून त्यातील 1 लाख 24 हजार 331 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 91 हजार 049 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये तर 25 हजार 697 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
Migrant Workers अनलॉकनंतर परप्रांतीय मजूर मुंबईत परतले,पालिका,रेल्वे पोलिसांकडून मजुरांचं स्क्रिनींग